agriculture news in Marathi, crop damage by nomadic animals , Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात असताना आता पिकांना वन्य प्राण्यांनी लक्ष्य केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. विशेषतः येथील वाघझरा पायथा परिसरात उसासह भुईमूग पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पिकांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात असताना आता पिकांना वन्य प्राण्यांनी लक्ष्य केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. विशेषतः येथील वाघझरा पायथा परिसरात उसासह भुईमूग पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पिकांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

 गेल्या महिन्यात अतिवृष्टीने विंगसह परिसरात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनस्तरावर त्याचे पंचनामेही झाले आहेत. त्यातून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. मात्र, अतिवृष्टीतून वाचलेल्या पिकांना आता वन्यप्राण्यांनी लक्ष्य केल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. विशेषतः विठ्ठलाई डोंगरपायथा परिसरात प्राण्यांचा उपद्रव अधिक आहे. डुक्कर, साळींदरने ऊस 
पिकांसह भुईमूग पिके फस्त केली आहेत. 

शंकरराव रघुनाथ खबाले व उमेश खबाले यांच्या एकरातील ऊस डुकरांनी फस्त केला आहे. सुभाष लक्ष्मण खबाले, बाळासाहेब खबाले, मोहन खबाले, प्रकाश खबाले, जयवंत गणपती खबाले आदी शेतकऱ्यांचे भुईमुगाचे मोठे नुकसान झाले 
आहे. वन्य प्राण्यांकडून पिकांवरील हल्ल्याचे सत्र अद्याप सुरूच 
आहे. संबंधित विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...