परभणी जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टर पिकांचे नुकसान

यंदाच्या पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर झालेल्या अतिवृष्टी तसेच पुरामुळे परभणी जिल्ह्यातील २६ महसूल मंडळातील साडे पाचशेहून अधिक गावातील शेतकऱ्यांच्या १ लाख ३० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Crop damage of one and a half lakh hectares in Parbhani district
Crop damage of one and a half lakh hectares in Parbhani district

परभणी ः यंदाच्या पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर झालेल्या अतिवृष्टी तसेच पुरामुळे परभणी जिल्ह्यातील २६ महसूल मंडळातील साडे पाचशेहून अधिक गावातील शेतकऱ्यांच्या १ लाख ३० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सप्टेंबर महिन्यातील सुमारे ४७ हजारावर हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती महसूल तसेच कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळांतील सर्व गावांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना पीकविमा परतावा तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बल (एनडीआरएफ) अंतर्गत आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटना, राजकीय पक्षांनी केली आहे.

जून ते ऑक्टोबर या कालवधीत जिल्ह्यातील ५० महसूल मंडळांपैकी परभणी, सिंगणापूर, पिंगळी (सर्व ता. परभणी), बोरी, सावंगी म्हाळसा, आडगाव,चाराठणा, वाघी धानोरा (सर्व ता. जिंतूर), सेलू, देऊळगाव, कुपटा, चिकलठाणा (सर्व ता.सेलू), मानवत, केकरजवळा, कोल्हा, ताडबोरगाव (सर्वा ता. मानवत), पाथरी, हादगाव, कासापुरी (सर्व ता. पाथरी), सोनपेठ, शेळगाव (ता. सोनपेठ) पालम (ता. पालम), पूर्णा, लिमला, कात्नेश्वर, चुडावा (सर्व ता. पूर्णा) या २६ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

अतिवृष्टीमुळे नाले, ओढे, नद्यांना आलेल्या पुराचे पाणी पिकांमध्ये सोयाबीन, कपाशी, तूर,ज्वारी आदी पिकांसह फळबागा, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सुमारे ५५० हून अधिक गावातील १ लाख ३० हजार हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका बसला आहे. गुरुवार (ता. १६) पर्यंत या मंडळातील सुमारे ४७ हजारावर हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. पाऊस सुरुच राहिल्यामुळे पंचनामे करण्याच्या कामात अडथळे येत आहेत.

अन्य २४ मंडळांतील पंचनाम्याची गरज झरी, पेडगाव, जांब, दैठणा,टाकळी कुंभकर्ण, जिंतूर, दुधगाव,बामणी, वालूर, रामपुरी, बाभळगाव, सोनपेठ, आवलगाव, वडगाव, गंगाखेड, महातपुरी, माखणी,  राणीसावरगाव, पिंपळदरी, चाटोरी, बनवस, पेठशिवणी, रावराजूर, ताडकळस,  कावलगाव या २४ मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद नसली तरी जोरदार पावसाने नुकसान झाले आहे.

सप्टेंबर पर्यंतच्या अतिवृष्टीग्रस्त मंडळातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत आले आहेत. पाऊस सुरू असल्यामुळे पीकहानी सर्वेक्षणासाठी अडचणी येत आहेत. लवकरच पंचनामे पूर्ण होतील. त्यानंतर अंतिम नुकसान क्षेत्र निश्चित होईल. - संतोष आळसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी

महसूल प्रशासनातर्फे अतिशय संथ गतीने पंचनामे केले जात आहेत. विमा दाव्यासाठी वेळेत माहिती सादर करणे आवश्यक आहे. पावसामुळे सर्वच मंडळातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना विमा परतावा देण्यात यावा.

- कॉ. विलास बाबर, निमंत्रक शेतकरी, सुकाणू समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com