सिंधुदुर्गात १० हजार हेक्टरवर नुकसान

सिंधुदुर्गात १० हजार हेक्टरवर नुकसान
सिंधुदुर्गात १० हजार हेक्टरवर नुकसान

 सिंधुदुर्ग: जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सर्वात मोठा फटका खरीप हंगामाला बसला आहे. जिल्ह्यातील १० हजार हेक्टर क्षेत्रातील भातशेती आणि बागायतीचे नुकसान झाले आहे. ८ हजार ७६० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून ९ हजार ३४० हेक्टरवरील भातशेती संकटात आली आहे. जिल्ह्यात सलग पाच ते सहा दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे महापुरांची स्थिती निर्माण झाली. नदीनाल्यांलगतच्या क्षेत्रातील भातशेतीमध्ये पुराचे पाणी घुसून ते सलग तीन चार दिवस शेती पाण्याखाली राहिली. त्यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी सहायकानी नुकसानीचे पंचनामे करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले आहेत. पुराचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसला आहे. भातशेतीचे २३८ गावांतील २३३३१ शेतकऱ्यांचे ९३४० हेक्टर क्षेत्र तर इतर पिकांमध्ये ३८८ गावांतील ५५२९  शेतकऱ्यांचे ६३५.४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. भातशेतीचे देवगड तालुक्यातील ९ गावांतील १७१ शेतकऱ्यांचे ७४ हेक्टर क्षेत्र, मालवण तालुक्यातील २६ गावांतील ५ हजार २१५ शेतकऱ्यांचे १ हजार ८४३ हेक्टर, कणकवली तालुक्यातील १९ गावांतील ३ हजार ८४२ हेक्टर, वैभववाडीमधील ७ गावातील १७८ शेतकऱ्यांचे ६४ हेक्टर क्षेत्र , सावंतवाडी तालुक्यातील २४  गावांतील ५ हजार ९७० शेतकऱ्यां‍चे  १ हजार ३९९ हेक्टर, दोडामार्गमधील भात पिकाचे २१ गावांतील  १ हजार १३८ हेक्टर, वेंगुर्ला तालुक्यातील २७ गावांमधील १ हजार ९९६ शेतकऱ्यांचे ६९८ हेक्टर क्षेत्र  कुडाळ तालुक्यातील १०५ गावांतील ४ हजार ८२० शेतकऱ्यां‍चे ३ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रातील भातशेतीचे पुरामुळे बाधित झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com