agriculture news in Marathi crop damage over 29 thousand heacter in Nagpur district Maharashtra | Agrowon

नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार हेक्टरला फटका 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली असून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यातही आला आहे.

नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली असून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यातही आला आहे. 

अतिवृष्टी व पुरामुळे सिंचन प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीमध्ये सोडल्यामुळे जिल्ह्यातील मौदा, कामठी, पारशिवणी, कुही, रामटेक व सावनेर आदी तालुक्यांतील ६१ वर गावे बाधित झालीत. यात ४ हजार ९११ कुटुंबाचा तर २८ हजार १०४ नागरिकांचा समावेश आहे. महसूल विभागातर्फे यापूर्वीच बाधित क्षेत्रातील शेतीसह, नागरी भागातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. पुरामुळे १६०२ जनावरे मृत्यू पावलेत, ७७६५ घरांची पडझड झाली. ५० जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. 

या पुराचा सर्वाधिक फटका हा खरीप पिकांना बसला आहे. जिल्ह्यात यंदा खरिपाचे एकूण क्षेत्र ५ लाख १०० हेक्टर इतके नियोजित करण्यात आले होते. त्यामध्ये या सातही तालुक्यांमध्ये खरिपाचे एकूण क्षेत्र हे २ लाख ६७ हजार ९००.९८ हेक्टर इतके असून २९ हजार २६२.११ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कोरडवाहूतील २७८२९.८५ हेक्टर, ओलिताखालील १३५२.४७ हेक्टर ७९.७९ हेक्टरमधील बहुवार्षिक पिकांचा समावेश आहे.

यामध्ये सर्वाधिक कापूस, सोयाबीन, तूर, धान या मुख्य पिकांसह भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे शेतकऱ्यांवर चांगलेच संकट कोसळले आहे. पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचेही पथक जिल्ह्यात येऊन गेले. त्यांनी आपला अहवाल केंद्राकडे सादर केल्याचे सांगण्यात आले. 

तालुकानिहाय एकूण क्षेत्र व पुरामुळे नुकसान झालेले क्षेत्र (हेक्टर) 

तालुका एकूण क्षेत्र नुकसानग्रस्त क्षेत्र 
कामठी २५६२९.९७ ९८७.६७ 
मौदा ४९६७३ १९४९.५४ 
नरखेड ४४००१.९९ ६२०.२ 
रामटेक २८००४.४५ ६७.४ 
पारशिवनी ३३८५५ २२२४.०५
सावनेर ४१४३४.९ ६५८५.१४ 
कुही ४५३०१.६७ १६८२८.११ 
एकूण २६७९००.९८ २९२६२.११ 

इतर ताज्या घडामोडी
पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून...वाशीम : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस...
कांदा बियाण्याचे दर कडाडलेसातारा ः कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे....
नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरणनगर : आठ दिवसांपूर्वी वाढ झालेल्या कांद्याच्या...
हळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील हवामान हळद...
केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीतनांदेड : चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला...
शाहू कृषी महाविद्यालयाच्या...कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी...
खर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः...औरंगाबाद : महाआघाडी सरकारने राज्यातील अतिवृष्टी,...
परभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे...परभणी ः राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी...
पीक नुकसानप्रश्नी शेतकरी संघर्ष समितीचा...परभणी ः परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक...तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीची अन्य पर्यायी नावे...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...
नगरमध्ये कापसाची व्यापाऱ्यांकडून अल्प...नगर ः कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर...