agriculture news in Marathi crop damage over 50 lac hector in state Maharashtra | Agrowon

राज्यात पीक नुकसान ५० लाख हेक्टरच्या पुढे 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

राज्यात खरीप पीक नुकसानीची माहिती गोळा करताना केवळ ऑक्टोबरचा नव्हे; तर थेट जूनपासून वेळोवेळी झालेली हानी गृहीत धरली जात आहे.

पुणे: राज्यात खरीप पीक नुकसानीची माहिती गोळा करताना केवळ ऑक्टोबरचा नव्हे; तर थेट जूनपासून वेळोवेळी झालेली हानी गृहीत धरली जात आहे. त्यामुळे एकूण नुकसानीचा आकडा ५० लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. 

राज्यभर सध्या पीक पंचनाम्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन्ही कालावधीतील एकूण नुकसान आत्ताच २० लाख हेक्टरच्या आसपास आहे. मात्र, काही जिल्ह्यांमधून थेट जूनपासूनचा कालावधी गृहीत धरून आकडेवारी पाठविली जात आहे. त्यामुळे जूनपासूनची आकडेवारी गृहीत धरण्यास शासनाने मान्यता दिल्यास एकूण नुकसान ५० लाख हेक्टरच्या पुढे जाईल, असा अंदाज अधिकारी व्यक्त करीत आहेत. 

ऑक्टोबरमधील पावसाने २६ जिल्ह्यात ९ लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा दिला होता. ही प्राथमिक माहिती चालू पंधरवड्याच्या अखेरची होती. त्यात पुन्हा महिना अखेरपर्यंत मोठी वाढ अपेक्षित आहे. 

‘‘पंचनाम्याचे अंतिम आकडे अजून हाती आलेले नाहीत. नजर अंदाजे येणारी जूनपासूनची माहिती बघता तसेच अजून पाऊस झाल्यास नुकसानीचे आकडे झपाट्याने वाढू शकतात,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

महसूल सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘‘यंदा १४५ लाख हेक्टरवर खरीप पेरा केला आहे. यातील किमान २० ते ३० लाख हेक्टरवरील पिके पावसाने बाधित होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीची मदत तातडीने मिळण्यासाठी आम्ही पंचनाम्याची प्रतीक्षा करीत आहोत. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांना ही जबाबदारी पार पाडायला हवी. तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.’’ 

खरीप पिकांमध्ये सर्वांत जास्त तडाखा सोयाबीनला बसला आहे. ४३ ते ४४ लाख हेक्टरवर यंदा सोयाबीन उभे होते. पावसामुळे त्यातील १० ते १२ लाख हेक्टर पिकाला तडाखा बसला आहे. ४३ लाख हेक्टरच्या आसपास असलेल्या कापूस पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, त्याचा निश्चित अंदाज अजूनही सरकारी यंत्रणेला आलेला नाही. 

‘‘सोयाबीन, कापूस, भात, ज्वारी तसेच कडधान्य पिकांचेही नुकसान झालेले आहे. याशिवाय फळपिकांत केळी, पपई व मोसंबीचे मोठे नुकसान दिसते आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर निश्चित चित्र स्पष्ट होईल. केंद्रीय पथक देखील लवकरच राज्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पथक येण्यापूर्वी नुकसानीची माहिती हाती येणे शक्य आहे,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

केंद्राकडून किती मदत मिळू शकते? 
केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निधीतून आधारित कोरडवाहू पिकाला प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपये, बागायतीला १३ हजार ५०० रुपये तर फळबागेसाठी १८ हजार रुपये मिळू शकतात. 

राज्य शासन काय करू शकते ? 

  • जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पंचनामा प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे. 
  • पंचनाम्याचे राज्यस्तरीय अहवाल मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवणे. 
  • उपलब्ध अहवालाच्या आधारे राज्याच्या नैसर्गिक आपत्ती निधीतून मदत जाहीर करणे. 
  • शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या व्यतिरिक्त राज्याच्या 
  • निधीतून विशेष पॅकेज जाहीर करणे 

इतर अॅग्रो विशेष
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...
कमी कालावधीत पक्व होणारे मधुर कलिंगड...नाशिक : बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन...
किमान तापमानात घट होणार पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार...
डाळिंब दरात मोठी सुधारणासांगली ः राज्यातील डाळिंब पीक यंदा सततचा पाऊस आणि...
पामतेल आयात शुल्कात कपात; केंद्र...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने कच्च्या...
टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...
'निवार’ चक्रीवादळाचा प्रभाव; राज्यात...पुणे ः बंगालच्या उपसागरात पूर्व किनाऱ्याकडे...
केळीची मागणी कायम, दर टिकून जळगाव : दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर...
तमिळनाडू, पुद्दुचेरीत धुमाकूळचेन्नई  ः निवार चक्रीवादळामुळे वेगवान...
गहू, हरभरा पेरणीला वेगपुणे : यंदा चांगल्या पाणीसाठ्यामुळे गहू व...
पहिल्याच टप्प्यात थकवली ३५० कोटींची ‘...पुणे : राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर...
आर्थिक चणचण,‘लम्पी’चे पशुधन बाजारावर...सांगली ः लॉकडाउनमुळे पशुधानाचे आठवडे बाजार तब्बल...
ऊसतोडणी मजुरांची संख्या यंदा दोन...नगर : राज्यातील साखर कारखान्यांवर ऊसतोडणी...
पणन महासंघाची खरेदी उद्यापासूननागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
मराठवाड्यातील बहुतांश धरणे तुडुंबऔरंगाबाद : यंदा जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील...
संकटकाळात श्री ब्रॅण्डद्वारे दर्जेदार...नाशिक जिल्ह्यातील वनसगाव येथील शैलेश व संदीप या...
सणांच्या हंगामात भाव खाणारी गाडे यांची...कांजळे (ता. भोर, जि. पुणे) येथील विलास गाडे यांनी...
महाटीत उपसरपंचपदासाठी साडेदहा लाखांची...नांदेड ः ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी उपसरपंचपदाचा...
राज्यात शनिवारपासून ‘जनप्रबोधन यात्रा’नगर/पुणे ः शेतकरी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या...