अमरावती जिल्ह्यात दोन हजार हेक्‍टरवरील पिकांना फटका

पीक नुकसान
पीक नुकसान

अमरावती : जिल्ह्यात १ जून ते ३ ऑगस्ट या कालावधीत बरसलेल्या मॉन्सूनमुळे तब्बल २०६३ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान नोंदविण्यात आले आहे. या ६३ दिवसांत तब्बल आठ जणांचा बळी गेला असून १५०४ घरांची पडझड झाल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली.  जून त्यानंतर जुलैच्या पंधरवाड्यापर्यंत उघडीप दिलेल्या पावसाने त्यानंतर मात्र जोरदार कमबॅक केले. जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. त्याच्या परिणामी २०६३.३६ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात धामणगाव रेल्वे तालुक्‍यातील ६१३.०६ व धारणी तालुक्‍यातील १४२८.३ हेक्‍टरवरील पिकांचा समावेश आहे. अतिवृष्टीत पशुपालकांचे देखील मोठे नुकसान झाले असून ११ मोठी दुधाळ जनावरे दगावली. त्यामध्ये अंजनगावसूर्जी तालुक्‍यातील एका पशुपालकाला ३० हजार रुपयांची मदत देण्यात आली. आठ लहान दुधाळ जनावरे तर ओढकाम करणारी लहान मोठी पाच जनावरे देखील या कालावधीत मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात आले.  १ जून ते ९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या पावसाने १६० गावातील १४७९ कुटुंबे बाधित झाली, तर १८ नागरिक जखमी झाले. यात अमरावती तालुक्‍यातील २६३, भातकुली २०४, नांदगाव खंडेश्‍वर १७, धामणगाव रेल्वे १८०, चांदूर रेल्वे ४६६, वरुड १, तिवसा ५, अचलपूर २५९, चांदूरबाजार १०, दर्यापूर ४६, अंजनगासूर्जी १६, धारणी चार व चिखलदरा तालुक्‍यातील आठ कुटूंबांचा समावेश आहे. जिल्ह्यात पावसामुळे अनेक घरांची पडझड देखील झाली. त्यामध्ये २२१ पक्‍की व कच्ची घरे पूर्णतः पडली. ५८ पक्‍क्‍या घरांची अंशतः पडझड झाली. अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्‍वर, धामणगावरेल्वे, चांदूररेल्वे, अचलपूर, वरुड, तिवसा, चांदूरबाजार, दर्यापूर, अंजनगावसूर्जी, चिखलदरा तालुक्‍यात कच्च्या घराची अंशतः पडझड झाली. या कालावधीत ११ जनावरांचे गोठे बाधित झाले.  जिल्ह्यात आठ जणांचा बळी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत आठ जणांचे बळी गेले आहेत. अंगावर वीज कोसळल्याने चार जण, पुरात वाहून गेल्याने एक, धरणात बुडून एक तर घराच्या छपरावरील दगड पडल्याने एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. नैसर्गिक आपत्तीत बळी गेलेल्या काहींच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत देण्यात आली आहे. वीस लाख रुपयांची ही मदत होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com