अकोला जिल्ह्यात वादळी पावसाने दाणादाण

lamon crop
lamon crop

अकोला ः जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी आलेला अवकाळी पाऊस, वादळ व गारपिटीत रब्बीतील गहू, हरभरा, बिजोत्पादन कांदा या पिकांसह लिंबू, पपई या फळपिकांचे अतोनात नुकसान झाले. अकोला, पातूर, बार्शीटाकळी, बाळापूर या तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले असून पंचनामा अहवाल बनविण्याचे काम सुरू झाले आहे. अकोला तालुक्यातील एकट्या कापशी महसूल मंडळात सुमारे ७०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अहवाल समोर आला आहे.  दोन दिवसांपूर्वी या भागात जोरदार पावसाने हजेरी दिली. प्रामुख्याने पातूर, बाळापूर, अकोला तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. या पावसात अकोला तालुक्यातील कापशी महसूल मंडळात ७०४ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचे म्हटले आहे. यात १०१ हेक्टरवरील गहू, ४७३ हेक्टरवरील हरभरा, ४८ हेक्टर कांदा, १४ हेक्टरमधील भाजीपाला, ५८ हेक्टरमधील लिंबू बागेचे नुकसान झाले आहे. माझोड, चिखलगाव, कापशी तलाव, कापशी रोड, कापशी या पाच गावातील हे नुकसान आहे. उर्वरित ठिकाणचे बुधवारी (ता. ११) अहवाल तयार केले जात होते. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव शिवारात होळीच्या दिवशी (सोमवार, ता. ९) झालेल्या पावसाने दाणादाण उडविली.   बार्शीटाकळी तालुक्यात सोमवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील फळबागांचे मोठे नुकसान झाले. धाबा, पुनोती या गावातील शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान झाले आहे. बाळापूर तालुक्यात वाडेगाव-देगाव परिसरातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील फळबागा, कांदा, गहू, हरभरा यासह वीटभट्ट्यांचे मिळून नुकसान झाले. वाडेगावमध्ये अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यांवर पाणी साचले होते. वादळामुळे काही घरे व दुकानांवरील छत उडाले.  रब्बी पिकांना फटका बार्शीटाकळी तालुक्यातील देगाव, वाडेगाव, मानकी, चिंचोली गणू, नकाशी या परीसराला पावसाने  झोडपल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळाचा जोरदार फटका लिंबू बागांना बसला असून लिंबूचा सडा पडला होता. पातूर तालुक्यात चरणगाव, वाडेगाव, सस्ती विवरा या भागात रब्बी पिकांसह लिंबू बागांचे नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com