agriculture news in Marathi crop damage by rain and hailstorm Maharashtra | Agrowon

वादळी पाऊस, गारपिटीने पिकांचे अतोनात नुकसान

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 मार्च 2020

वाशीम ः जिल्ह्यात बुधवारी (ता. १८) रात्री वाशीम, कारंजा, मंगरुळपीर तालुक्यात पूर्वमोसमी पाऊस झाला. या पावसासोबतच वादळीवारे, गारपीट झाल्याने गहू, हरभरा, भाजीपाला, फळबागा, कलिंगड, कांदा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अहवाल तयार केला जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

वाशीम ः जिल्ह्यात बुधवारी (ता. १८) रात्री वाशीम, कारंजा, मंगरुळपीर तालुक्यात पूर्वमोसमी पाऊस झाला. या पावसासोबतच वादळीवारे, गारपीट झाल्याने गहू, हरभरा, भाजीपाला, फळबागा, कलिंगड, कांदा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अहवाल तयार केला जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

बुधवारी (ता. १८) सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. प्रामुख्याने तीन तालुक्यांना पावसाने झोडपले. जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पूर्वमोसमी पाऊस झाला. त्यातच बोराच्या आकाराची गारही पडली. यामुळे उंबर्डाबाजार, पिंप्री भोयर, येवता बंदी व मनभा परिसरामधील शेतशिवारातील रब्बी पिकासह भाजीपाला वर्गीय पिके जमीन दोस्त झाली. रात्री दोनच्या सुमारास आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस व तुफान गारपिटीने गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले. 

हरभरा, काकडी, कलिंगड, टोमॅटो, कोथिंबीर, पपई, संत्रा, खरबूज, कांदा, वांगी, कोबी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे अस्मानी संकट ओढवले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक वृक्षसुद्धा उन्मळून पडले. तुफान गारपिटीत अनेक पक्षी गंभीर जखमी झाले. काही पक्ष्यांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला.

गारपिटीने नुकसान झालेल्या भागात गुरुवारी सकाळपासूनच पंचनामे तयार करण्याचे काम सुरू झाले होते. मंगरुळपीर तालुक्यात तर सलग दुसऱ्या दिवशी गारपीट झाली आहे. गारपिटीचा जोर कारंजा तालुक्यात सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे.


इतर अॅग्रो विशेष
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...