crop damage
crop damage

मुसळधार पावसाचा तडाखा

मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे.

पुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. सरकारने त्वरित पंचनामे करून झालेल्या अतोनात नुकसानीचा मोबदला लवकरात लवकर देऊन मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. रायगड व रत्नागिरी भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला. पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, आंबेगाव, बारामती व नगरमधील नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव भागाला जोरदार पावसाने झोडपल्याने ओढ्यांना पूर आल्याची स्थिती होती. त्यामुळे नेवासा तालुक्यात कुकाणा दहिगाव येथे ओढ्याच्या पाण्यात एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली. अनेक ठिकाणी बांध फुटल्याच्या घटना घडल्या असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होता. तर काही ठिकाणी जोरदार  पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे.  खानदेशातील नंदुरबार, जळगावमध्ये झालेल्या पावसामुळे गिरणेला प्रथमच पूर आला होता. औरंगाबादमधील सोयगाव तालुक्यातील पळाशी बनोटी आणि परिसरात रात्री झालेल्या जोरदार पावसाने गावात पाणी शिरले. परभणी,  हिंगोली जिल्ह्यातील ६३ मंडळामध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.  परभणी जिल्ह्यातील सावंगी म्हाळसा, पाथरी, तर हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार मंडळात अतिवृष्टी झाली. पाथरी येथे राज्यातील सर्वाधिक १०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.ब्रम्हवाकडी (ता.सेलू)  येथील निम्म दुधना प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९४ टक्के पर्यंत वाढला. त्यामुळे रविवारी सकाळी चार दरवाजे  उघडण्यात आले. नदीपात्रात ७११९९ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात येत                                                                 आहे.

रविवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्त्रोत, हवामान विभाग) कोकण ः श्रीवर्धन ४८, हर्णे ३०.८. मध्य महाराष्ट्र : अकोले ७०, कोपरगाव ४८, नेवासा ४०, राहुरी ५३, सावळीविहीर ४३, धुळे ८५, साक्री ५०, शिंदखेडा ५२, चंदगड ७७, देवळा ७९.४, दिंडोरी ४३,कळवण ७९, मालेगाव ५१, नांदगाव ४७, निफाड ५३.५, सटाना ४०, सिन्नर ७१, राजगुरूनगर ४५. मराठवाडा ः सोयगाव ४९, केज ४६, माजलगाव ५८, पाटोदा ५४, औंढा नागनाथ ४६, भोकरदन ४५, जालना ७२, मंथा ६४, परतूर ७८, मानवत ६८,सोनपेठ ८५. विदर्भ ः कळमेश्वर ३२.८, कुही २६.२, मालेगाव २४.३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com