agriculture news in Marathi crop damage by rain in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मुसळधार पावसाचा तडाखा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. 

पुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. सरकारने त्वरित पंचनामे करून झालेल्या अतोनात नुकसानीचा मोबदला लवकरात लवकर देऊन मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

रायगड व रत्नागिरी भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला. पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, आंबेगाव, बारामती व नगरमधील नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव भागाला जोरदार पावसाने झोडपल्याने ओढ्यांना
पूर आल्याची स्थिती होती. त्यामुळे नेवासा तालुक्यात कुकाणा दहिगाव येथे ओढ्याच्या पाण्यात एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली. अनेक ठिकाणी बांध फुटल्याच्या घटना घडल्या असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होता. तर काही ठिकाणी जोरदार  पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

खानदेशातील नंदुरबार, जळगावमध्ये झालेल्या पावसामुळे गिरणेला प्रथमच पूर आला होता. औरंगाबादमधील सोयगाव तालुक्यातील पळाशी बनोटी आणि परिसरात रात्री झालेल्या जोरदार पावसाने गावात पाणी शिरले. परभणी,  हिंगोली जिल्ह्यातील ६३ मंडळामध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.  परभणी जिल्ह्यातील सावंगी म्हाळसा, पाथरी, तर हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार मंडळात अतिवृष्टी झाली.

पाथरी येथे राज्यातील सर्वाधिक १०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.ब्रम्हवाकडी (ता.सेलू)  येथील निम्म दुधना प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९४ टक्के पर्यंत वाढला. त्यामुळे रविवारी सकाळी चार दरवाजे  उघडण्यात आले. नदीपात्रात ७११९९ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात येत                                                                 आहे.

रविवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्त्रोत, हवामान विभाग) कोकण ः श्रीवर्धन ४८, हर्णे ३०.८. मध्य महाराष्ट्र : अकोले ७०, कोपरगाव ४८, नेवासा ४०, राहुरी ५३, सावळीविहीर ४३, धुळे ८५, साक्री ५०, शिंदखेडा ५२, चंदगड ७७, देवळा ७९.४, दिंडोरी ४३,कळवण ७९, मालेगाव ५१, नांदगाव ४७, निफाड ५३.५, सटाना ४०, सिन्नर ७१, राजगुरूनगर ४५. मराठवाडा ः सोयगाव ४९, केज ४६, माजलगाव ५८, पाटोदा ५४, औंढा नागनाथ ४६, भोकरदन ४५, जालना ७२, मंथा ६४, परतूर ७८, मानवत ६८,सोनपेठ ८५. विदर्भ ः कळमेश्वर ३२.८, कुही २६.२, मालेगाव २४.३.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात उकाडा वाढण्यास सुरूवात  पुणे ः परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार...
पीकविमा परतावा तात्काळ द्या, अन्यथा...अमरावती : जिल्ह्यात एआयसी कंपनीच्या (ॲग्रिकल्चर...
कापूस उत्पादनात मोठी घट, पीक परवडेनाजळगाव ः अतिपावसात १२ एकर कापूस पिकात फूलगळ झाली....
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
‘कडकनाथ’ कुक्कुटपालनात निर्माण केल्या...आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १००...
व्यवहारापलिकडचा विचारदसऱ्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
आत्मनिर्भर नव्हे, समृद्ध होऊ याशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते स्व. भास्करभाऊ बोरावके...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...
सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणारपुणे: राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान...
आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...