दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत.
rain
rain

पुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कोल्हापूर, सांगली पूरपरिस्थिती अजूनही काहीशी तशीच आहे. तर चिपळूणमधील पूरपरिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. महापूर व अतिवृष्टीमुळे राज्यात जवळपास दोन लाख हेक्टरहून अधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. 

गेल्या आठवडाभर कोकणात पावसाने हाहाकार केला होता. यामुळे पूरपरिस्थिती उद्भवली असून अनेक गावे पाण्याखाली गेली आहे. अजूनही या भागातील पूरस्थिती फारशी कमी झालेली नाही. मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. रविवारी (ता.२५) सकाळी आठ वाजेपर्यंत रायगडमधील सुधागडपाली येथे अवघे ९० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर, पोलादपूर येथे ७३, कर्जत ४३.२, माणगाव ४५, माथेरान ४७.२, म्हसळा ४७, पेण ४८, रोहा ४१, तळा ५९, पालघरमधील जव्हार ३६, रत्नागिरीतील मंडणगड ५०, राजापूर ३८, संगमेश्‍वर ३४, सिंधुदुर्गमधील कुडाळ ३१, रामेश्‍वर ५५, सावंतवाडी ४९, वैभववाडी ६४ मिलिमीटर पाऊस पडला. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे कोकणातील अनेक भागांत मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

मध्य महाराष्ट्रात पश्‍चिम पट्ट्यात पाऊस  पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडला. शनिवारपासून या भागातील पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. पश्‍चिम पट्ट्यात पावसाच्या काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे सर्वाधिक १८६.७ मिलिमीटर पाऊस पडला. तर जावळीमेढा येथे ३४ मिलिमीटर पाऊस पडला असून, उर्वरित भागात तुरळक सरी बरसल्या. कोल्हापुरातील गगनबावडा येथे १२० मिलिमीटर तर, गडहिंग्लज ३४, राधानगरी ८६, शाहूवाडी ६६, नंदूरबारमधील तळोदा ७४, नाशिकमधील दिंडोरी ३०, इगतपुरी ३०, ओझरखेडा ५९.२, पेठ ४१.२, त्र्यंबकेश्‍वर ७२, पुण्यातील भोर ४५, लोणावळा कृषी ६७.३, पौड ३०, वेल्हे ३० मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे धरणांत पाण्याची आवक सुरू असली तरी पाणीपातळी काहीशी स्थिर आहे. काही धरणातून पाण्याचा विसर्ग अजूनही सुरू आहे. महापूर व पावसामुळे कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर, तर पुण्यात चार हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे. 

मराठवाडा, विदर्भात तुरळक सरी  गेल्या दहा ते बारा दिवस मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली भागांत मुसळधार पाऊस कोसळला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले. मात्र, दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतातील पाणी ओसरू लागले आहे. रविवारी सकाळपर्यंत नांदेडमधील माहूर येथे ४८ मिलिमीटर पाऊस पडला. तर अनेक भागांत तुरळक सरी पडल्या असून ढगाळ वातावरण होते. विदर्भातही अमरावतीतील चिखलदरा ३४.६, परतवाडा ३७.८, चंद्रपुरातील सिंदेवाही ३५.४, गडचिरोलीतील अहेरी ३५.१ मिलिमीटर पाऊस पडल्याचे नोंदविले गेले. अनेक भागांत पावसाने चांगलीच उसंत घेतली आहे. त्यामुळे पिकांच्या नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होताना दिसून येत आहे. परभणीत अतिवृष्टीमुळे ३४ हजार हेक्टर, तर विदर्भात ६६ हजार हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे.  या नद्या दुथडी भरून वाहत आहेत  कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी, सूर्या (वैतरणा खोरे), जगबुडी, वशिष्टी, सावित्री, पंचगंगा, कृष्णा, मुठा, भीमा, गोदावरी (नांदेड), पूर्णा, बाघ, वैनगंगा(भंडारा), कन्हान, वैनगंगा (गोंदिया), बावनथडी, वैनगंगा (चंद्रपूर), वैनगंगा (गडचिरोली).  या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे (क्युसेकमध्ये)  कोयना २९२३२, धोम ६८९५, कण्हेर ४९१३, वारणावती ८७२०,  उरमोडी १२५१, धोम बलकवडी १६६९, तारळी ४१६०, खडकवासला १५५०, कळमोडी १८८४, आंध्रा १४६२, वडीवळे २९३, वीर ५९५, वडज ५०५, कासारसाई २५०, चिल्हेवाडी ४४५,  राज्यात रविवारी (ता.२५) सकाळपर्यंत धरणक्षेत्रनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) :  कोयना १०८, महाबळेश्‍वर १७३, धोम बलकवडी १००, धोम २२, कण्हेर ३८, वारणावती ८६, दुधगंगा ७९, राधानगरी ९५, तुळशी ८१, कासारी ८०, पाटगाव ७४, तारळी ७१, पिंपळगाव जोगे ३६, माणिकडोह ३१, कळमोडी ५३, वडीवळे २०, पवना ५४, मुळशी ६०, टेमघर ८५, वरसगाव ६७, पानशेत ६०, गुंजवणी २५, निरा देवघर ९२, चिल्हेवाडी ५८, गंगापूर ३५, भंडारदरा ४३, सूर्या धामणी २०, वैतरणा २३, वाण २७, ऊर्घ्व वर्धा २१. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com