पुणे : हरभरा उत्पादनवाढीसाठी ४०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिक

हरभरा उत्पादनवाढीसाठी ४०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिक
हरभरा उत्पादनवाढीसाठी ४०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिक

पुणे ः हरभरा उत्पादनवाढीसाठी रब्बी हंगामात अकरा तालुक्यांत ४०० हेक्टरवर हरभरा पीक प्रात्यक्षिके प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रतिहेक्टरी नऊ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी हरभरा उत्पादकांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या सूत्रांनी केले.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाअंतर्गत भात उत्पादन वाढविण्यासाठी प्रकल्प ‘आत्मा’कडे नोंदणीकृत असलेल्या गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यामध्ये हरभरा लागवडीचे ४०० प्रकल्प राबविण्यात येत आहे. दहा हेक्टरचा एक प्रकल्प असून गटातील प्रत्येकी शेतकऱ्यांना एक एकराचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची मानसिकता असलेले शेतकरी गटाची निवड केली जाणार आहे. यामध्ये शेतकरी गटांना, शेतकरी प्रशिक्षणे, ग्रामबिजोत्पादन, प्रमाणित बियाणे दिले जाणार असून खते, जैविक खते, जैविक औषधांची खरेदी गटांना करावी लागणार आहे. त्यानंतर डीबीटीद्वारे गटांच्या खात्यामध्ये

अनुदानाची रक्कम बँक खात्यामध्ये जमा करणार हरभरा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दहा वर्षांच्या आतील वाणाचे बियाणे दिले जाणार आहे. यामध्ये जुन्नर आणि बारामतीत सर्वाधिक आठ प्रकल्प घेण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही तालुके मिळून जवळपास १६० हेक्टर क्षेत्र हरभरा पिकांखाली येणार आहे. शिरूर तालुक्यातही ५ प्रकल्प घेण्यात येणार असून त्यामुळे ५० हेक्टर क्षेत्र पिकांखाली येणार आहे. याशिवाय निवडलेल्या शेतकरी गटांना ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियानाच्या पंधरवाड्यात कृषी तज्ज्ञ, अधिकारी यांच्यामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय हरभरा प्रात्यक्षिक संख्या व कंसात क्षेत्र, हेक्टरमध्ये मावळ १ (१०), मुळशी १ (१०), हवेली २ (२०), खेड ४ (४०), आंबेगाव ४ (४०), जुन्नर ८ (८०), शिरूर ५ (५०), बारामती ८ (८०), पुरंदर ३ (३०), दौंड २ (२०), इंदापूर २ (२०)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com