Agriculture news in Marathi, Crop demonstration on 400 hectares for Gram production | Page 2 ||| Agrowon

पुणे : हरभरा उत्पादनवाढीसाठी ४०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिक

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

पुणे ः हरभरा उत्पादनवाढीसाठी रब्बी हंगामात अकरा तालुक्यांत ४०० हेक्टरवर हरभरा पीक प्रात्यक्षिके प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रतिहेक्टरी नऊ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी हरभरा उत्पादकांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या सूत्रांनी केले.

पुणे ः हरभरा उत्पादनवाढीसाठी रब्बी हंगामात अकरा तालुक्यांत ४०० हेक्टरवर हरभरा पीक प्रात्यक्षिके प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रतिहेक्टरी नऊ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी हरभरा उत्पादकांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या सूत्रांनी केले.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाअंतर्गत भात उत्पादन वाढविण्यासाठी प्रकल्प ‘आत्मा’कडे नोंदणीकृत असलेल्या गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यामध्ये हरभरा लागवडीचे ४०० प्रकल्प राबविण्यात येत आहे. दहा हेक्टरचा एक प्रकल्प असून गटातील प्रत्येकी शेतकऱ्यांना एक एकराचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची मानसिकता असलेले शेतकरी गटाची निवड केली जाणार आहे. यामध्ये शेतकरी गटांना, शेतकरी प्रशिक्षणे, ग्रामबिजोत्पादन, प्रमाणित बियाणे दिले जाणार असून खते, जैविक खते, जैविक औषधांची खरेदी गटांना करावी लागणार आहे. त्यानंतर डीबीटीद्वारे गटांच्या खात्यामध्ये

अनुदानाची रक्कम बँक खात्यामध्ये जमा करणार
हरभरा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दहा वर्षांच्या आतील वाणाचे बियाणे दिले जाणार आहे. यामध्ये जुन्नर आणि बारामतीत सर्वाधिक आठ प्रकल्प घेण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही तालुके मिळून जवळपास १६० हेक्टर क्षेत्र हरभरा पिकांखाली येणार आहे. शिरूर तालुक्यातही ५ प्रकल्प घेण्यात येणार असून त्यामुळे ५० हेक्टर क्षेत्र पिकांखाली येणार आहे. याशिवाय निवडलेल्या शेतकरी गटांना ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियानाच्या पंधरवाड्यात कृषी तज्ज्ञ, अधिकारी यांच्यामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय हरभरा प्रात्यक्षिक संख्या व कंसात क्षेत्र, हेक्टरमध्ये
मावळ १ (१०), मुळशी १ (१०), हवेली २ (२०), खेड ४ (४०), आंबेगाव ४ (४०), जुन्नर ८ (८०), शिरूर ५ (५०), बारामती ८ (८०), पुरंदर ३ (३०), दौंड २ (२०),
इंदापूर २ (२०)


इतर बातम्या
सांगली जिल्ह्यात हळद पिकावर कंदकुज,...सांगली  ः महापूर आणि अतिवृष्टीमुळे कंदकुज...
ओला दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलन करू...कोल्हापूर   ः दक्षिण महाराष्ट्रात ओला...
खानदेश, मराठवाडा, विदर्भातील काही...पुणे  ः राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान...
पाच जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य...अकोला  : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य...
शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमुक्त करा :...सांगली  ः गेली काही वर्षे दुष्काळ आणि...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
कांदा दरप्रश्नी लासलगाव येथे आंदोलननाशिक : केंद्र शासनाने केलेली कांदा निर्यातबंदी...
सुमन चंद्रा बुलडाण्याच्या...बुलडाणा : जिल्ह्याला सलग दुसऱ्यांदा महिला...
तूर पिकावरील किडींचे व्यवस्थापन करावे ः...बुलडाणा  : तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या...
नाशिकमधील पीडित महिलांसाठी ‘सखी’...नाशिक : ‘‘समाजात वावरताना महिलांना अनेक...
...अखेर जायकवाडीतून रब्बी सिंचनासाठी...औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पावरून कालव्या‌द्वारे...
अकरा महिन्यांनंतर पिकांची नुकसानभरपाईपुणे ः पिकांची नुकसानभरपाई मिळत नसल्याचे अनुभव...
सांगलीत आडसाली उसाला महापुराचा फटकासांगली : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात एक लाख...बीड : यंदाच्या रब्बीत औरंगाबाद, जालना व बीड या...
परभणी येथे दूध संकलनातील घट सुरूचपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत परभणी येथील दुग्ध...
सातारा : ‘शेतकरी सन्मान’चा निधी मिळालाच...सातारा ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत निर्बंधमुक्ती...नांदेड, परभणी, हिंगोली ः शेतकरी संघटनेतर्फे शरद...
सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री...सोलापूर : राज्यात शासकीय नोकऱ्यांचे प्रमाण कमी...