agriculture news in marathi, crop demonstration scheme status, nagar, maharashtra | Agrowon

नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार हेक्टरवर प्रात्यक्षिक
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध योजनांमधून १५ हजार २१४ हेक्टर क्षेत्रावर यंदा रब्बी हंगामात पीक प्रात्यक्षिक घेण्याचे नियोजन आहे. या वर्षी दुष्काळी स्थितीमुळे पाणीटंचाई असली तरी पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी नियोजन करून गहू, हरभऱ्याची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध योजनांमधून १५ हजार २१४ हेक्टर क्षेत्रावर यंदा रब्बी हंगामात पीक प्रात्यक्षिक घेण्याचे नियोजन आहे. या वर्षी दुष्काळी स्थितीमुळे पाणीटंचाई असली तरी पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी नियोजन करून गहू, हरभऱ्याची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

रब्बीत कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व एसएमएसपी योजनेतून दरवर्षी पीक प्रात्यक्षिक घेतले जाते. त्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना दहा वर्षांपेक्षा जुने असलेल्या वाणाला प्रतिकिलो ५० रुपये तर दहा वर्षांच्या आतील वाणाला २५ रुपये प्रतिकिलो अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यात गव्हाची ९३०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाणार असून त्यासाठी ९३०० क्विंटल बियाणे वाटप केले जाणार आहे.

हरभऱ्याची साडेआठ हजार हेक्टरवर पेरणी केली जाणार असल्याने त्यासाठी ५९१४ क्विंटल बियाणे उपलब्ध करुन दिले जाणार आहे. हरभऱ्यासाठी एकरी ३० किलो, तर गव्हासाठी ४० किलो बियाणे अनुदानावर दिले जाईल. सध्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता बहुतांश भागात पाण्याची उपलब्धता नाही. त्याचा या पीक प्रात्यक्षिकांवर परिणाम होणार असल्याची प्रशासनाला जाणीव आहे. मात्र उपलब्ध पाण्यानुसार शक्य त्या शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

असे आहे नियोजन

  • हरभरा क्षेत्र -  ८५०० हेक्टर
  • गहू क्षेत्र  - ९३०० हेक्टर
  • बियाणे रक्कम - १८ कोटी
  • अनुदान - ६ कोटी ४० लाख
  • शेतकरी हिस्सा - ११ कोटी ६० लाख

 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...