नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
बातम्या
मानोलीत रब्बी ज्वारीची पीक प्रात्यक्षिक पाहणी
परभणी ः ‘‘आहारात ज्वारीच्या भाकरीस पोषणाच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. ज्वारीवर प्रक्रिया करून विविध उत्पादनांची निर्मिती करून विक्री केल्यास मूल्यवर्धन होईल. चांगला बाजारभाव मिळून शेतकऱ्यांचा फायदा होईल.’’
परभणी ः ‘‘आहारात ज्वारीच्या भाकरीस पोषणाच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. ज्वारीवर प्रक्रिया करून विविध उत्पादनांची निर्मिती करून विक्री केल्यास मूल्यवर्धन होईल. चांगला बाजारभाव मिळून शेतकऱ्यांचा फायदा होईल,’’ असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्र व अखिल भारतीय समन्वित ज्वार सुधार प्रकल्प, हैद्राबादतर्फे मंगळवारी (ता. २३) मानोली (ता. मानवत) येथे शेतकरी अशोकराव मांडे यांच्या शेतात रब्बी ज्वारी आद्यरेषीय पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी ऋषीकेश मांडे होते. केद्रांचे प्रभारी अधिकारी डॉ. के. आर. कांबळे, डॉ. एल. एन. जावळे, डॉ. मो. इलियास, डॉ .व्ही. एम. घोळवे, डॉ. मदन पेंडके, प्रगतिशील शेतकरी मदनराव शिंदे, रामभाऊ शिंदे आदी उपस्थित होते.
डॉ. कांबळे यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या रब्बी ज्वारीच्या नवीन वाण व लागवडीबाबत माहिती दिली. यावेळी लक्ष्मण शिंदे, शेख दस्तगीर यांच्या शेतावरील रब्बी ज्वारी पीक प्रात्यक्षिकाची पाहणी करण्यात आली. शेख दस्तगीर, बाबूराव जाधव, रामकिशन पटेल, गोपाल शिंदे, सुनील शिंदे, सुरेश मांडे, उत्तम लेंगुळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
- 1 of 1589
- ››