वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी पिकाला साडीचे कुंपण

Crop fence for crop protection from wildlife
Crop fence for crop protection from wildlife

यवतमाळ ः जिल्ह्यात वन्यप्राण्यांमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीत वाढ झाली आहे. तारेच्या कुंपणावर होणारा खर्च परवडणारा नसल्याने शेतकरी साड्यांचे कुंपण करून तात्पुरत्या स्वरूपात पीक संरक्षणाचा प्रयत्न करीत आहेत. 

जिल्ह्यात खरिपात सुमारे पाच लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड होते. या वर्षी संततधार पाऊस त्यानंतर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कापसावर वाढीस लागला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक काढून टाकले. जमिनीतील ओलावा आणि संरक्षित सिंचनाचे पर्याय असलेल्या शेतकऱ्यांनी हरभरा, गहू लागवड केली. हे पीक ऐन बहरात असतानाच जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. 

सरोटी, महागाव, वणी, चंद्रपूर, उमरखेड, महागाव हे परिसर अभयारण्याशी संलग्नीत आहेत. त्यामुळे या भागातील शिवारात वन्यप्राण्यांचा मुक्‍त संचार राहतो. हे प्राणी शेतात शिरुन पिकाचे नुकसान करीत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर वन विभागाने १०० टक्‍के अनुदानावर कुंपणाकरिता योजना राबवावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे.

वनमंत्र्यांकडून अपेक्षा जिल्ह्याला संजय राठोड यांच्या माध्यमातून तिसऱ्यांदा वनमंत्रिपद लाभले आहे. वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीच्या कटकटीपासून मुक्‍ततेसाठी ते पाऊल उचलतील आणि १०० टक्‍के अनुदानावर कुंपण योजना जाहीर करतील, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांची आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांतील दुष्काळी स्थितीमुळे बरी नाही. त्यामुळे शेतीचे व्यवस्थापन करण्यासाठी पैशाची सोय करणे शक्‍य होत नाही. परिणामी, तात्पुरत्या स्वरूपातीलच उपाय ते योजतात. कुंपण म्हणून साडीचा पर्यायदेखील असाच आहे. शासनाने याची दखल घेत कुंपणाकरिता अनुदान देण्याची गरज आहे. - मनीष जाधव, शेतकरी वागद, ता. महागाव, जि. यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com