पीक वाढीच्या गरजेनुसार अन्नद्रव्ये महत्त्वाची...

माती आणि विविध खतांतून अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात वापर झाल्यास पिकांच्या जीवनचक्रातील सर्व प्रक्रिया सुरळीत होऊन पिके निरोगी राहतात. पीक वाढीच्या गरजेनुसार अन्नद्रव्यांचा समतोल वापर करावा.
पीक वाढीच्या गरजेनुसार अन्नद्रव्ये महत्त्वाची...
पीक वाढीच्या गरजेनुसार अन्नद्रव्ये महत्त्वाची...

माती आणि विविध खतांतून अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात वापर झाल्यास पिकांच्या जीवनचक्रातील सर्व प्रक्रिया सुरळीत होऊन पिके निरोगी राहतात. पीक वाढीच्या गरजेनुसार अन्नद्रव्यांचा समतोल वापर करावा. पिकांच्या वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. प्रत्येक अन्नद्रव्यांची पिकांमध्ये विशिष्ट प्रकारचे कार्य करण्याची क्षमता आहे. या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर दृश्य परिणाम दिसून येतात. मुख्यत्वे अन्नद्रव्याचे वर्गीकरण हे भरपूर प्रमाणात लागणारी मुख्य अन्नद्रव्ये, मध्यम प्रमाणात लागणारी दुय्यम अन्नद्रव्ये आणि कमी प्रमाणात लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये असे केले जाते. नत्र, स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये माती, पाणी आणि वातावरणातील हवेतून मोठ्या प्रमाणावर पुरविली जातात. ही अन्नद्रव्ये पिकांच्या आंतरिक प्रक्रियेत भाग घेतात. नत्र 

  • पिकांतील प्रथिने आणि हरितद्रव्ये तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत करणारा नत्र हा महत्त्वाचा घटक आहे.
  • पिकांची पाने हिरवीगार राहतात. पाने आणि खोडाची वाढ झपाट्याने होते.
  • धान्य आणि कडब्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढते. नत्राच्या योग्य पुरवठ्यामुळे स्फूरद, पालाश व इतर अन्नघटकांचे पिकाद्वारे शोषण होण्यास बरीच मदत होते.
  • मात्र नत्राच्या अधिक वापर झाल्यास पालवीची अधिक वाढ होते. ती लुसलुशीत होऊन किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वाढते. कमतरतेची लक्षणे
  • झाडांची अधिक परिपक्व झालेली पाने अगोदर हळूहळू पिवळी पडतात.
  • मुळे आणि खोडांची वाढ मंदावते. झाडांना नवीन फूट येत नाही, फुले कमी येतात, तृणधान्य, दाणे व फळे पूर्णपणे पक्व होत नाही.
  • स्फूरद

  • पिकांच्या पेशींचे विघटन आणि वाढीसाठी स्फुरदाची गरज असते.
  • स्फुरदाच्या उपलब्धतेमुळे अंकुरण लवकरच होऊन बाल्यावस्थेत लवकर मुळ्या फुटतात.
  • मुळ्यांचे जाळे तयार झाल्याने पीक मजबूत मुळ्यांमुळे जमिनीवर लोळत नाही.
  • फुले, दाणे भरपूर येतात. आणि त्यातील खनिज द्रव्यांचे प्रमाण वाढते.
  • द्विदल वनस्पतीमध्ये स्फुरदामुळे सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. मुळ्यांवरील गाठीच्या प्रमाणात वाढ होते.
  • आवश्यकतेपेक्षा स्फुरदाची अधिक मात्रादेखील पिकांवर अनिष्ट परिणाम घडवून आणते. कमतरतेची लक्षणे 
  • सर्वसाधारणपणे पिकांची वाढ खुंटते, त्यामुळे तृणधान्य, फळे आणि कडधान्याचे उत्पादन कमी होऊन पानांवर जांभळसर छटा दिसते.
  • पानावरील दाट हिरवेपणा आणि जांभळी छटा हे स्फुरदाच्या कमतरतेचे मुख्य लक्षण आहे.
  • पालाश 

  • पिकांची वाढ जोमदारपणे होते. कणखरपणा येतो. त्यामुळे पिके अधिक वाढली तरी जमिनीवर लोळत नाहीत.
  • कोरडवाहू जमिनीत पालाशच्या वापरामुळे बाष्पीभवनाची क्रिया मंदावते. पेशींमध्ये पाणी अधिक साठवून राहते.
  • पिकांमध्ये पिष्टमय आणि शर्करायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी पालाशाची गरज असते.
  • पालाश हा महत्त्वाचा विकर घटक असून संश्लेषित शर्करा आणि पिष्टमय पदार्थ बिया मुळे, कंद, फळाकडे वाहून नेण्याचे कार्य करते.
  • प्रथिने तयार करण्याचे काम पालाशमुळे नियंत्रित केले जाते. कीड, रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • फळाचा आणि दाण्याचा रंग चकाकदार होतो. कमतरतेची लक्षणे 
  • जुन्या पानाच्या कडा पिवळसर होऊन तांबडे ठिपके पडतात.
  • सर्वसाधारण पिकांची वाढ मंदावते. पिकांचे धांडे कमजोर होतात, शेंडे जळतात, बिया आणि फळांचा आकार ओबडधोबड होतो.
  • कमी प्रमाणात लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये

    जस्त 

  • महत्त्वाच्या विकरांचा प्रत्यक्ष घटक आहे.
  • संप्रेरकाची निर्मिती पिकांमध्ये असलेल्या जस्ताच्या प्रमाणावर अवलंबून असते. वाढबिंदूची वाढ झपाट्याने होण्यास मदत करते. कमतरतेची लक्षणे 
  • पेरांची वाढ बरोबर होत नसल्यामुळे पाना आकार बदलतो, शिरा स्पष्ट पिवळ्या पडतात.
  • कांड्या-कांड्यातील अंतर कमी होऊन उंची कमी होते, फूल आणि फळधारणा कमी होते.
  • लोह

  • हरितद्रव्य तयार करण्यास मदत करते.
  • अनेक विकरांचा घटक असून इलेक्ट्रॉन स्थलांतर क्रियेत आणि इतर जीव रासायनिक क्रियेत सहभाग असतो.
  • नत्रस्थिरीकरणामध्ये नायट्रोजीनेज या लोहयुक्त विकराचे कार्य महत्त्वाचे आहे. कमतरतेची लक्षणे ः
  • लक्षणे प्रथम नवीन कोवळी पाने, उमलत्या कळ्या, वाढबिंदू इत्यादींवर स्पष्ट दिसतात.
  • पिकांची कोवळी पाने पिवळी पडतात.
  • पानातील नसांचा आतील भाग पिवळा होऊन कमतरता अधिक असेल तर पांढरी आणि जर्जर होतात.
  • पाने, कळ्या व वाढबिंदू गळून पडतात. फुले कमी आणि वांझ निर्माण होतात.
  • मँगॅनीज 

  • पिकांच्या जैविक आणि जीवरासायनिक प्रक्रियांना मँगॅनीज द्रव्य उत्तेजित करण्याचे कार्य करते.
  • जीवनसत्त्व “क” च्या संश्लेषण क्रियेत मोठा वाटा आहे.
  • प्रथिन संश्लेषण कमतरतेमुळे अमिनो आम्लाचे प्रमाण वाढते, नायट्रेटचा साठा वाढतो.
  • ऊर्जा शक्ती पुरविणाऱ्या पदार्थांच्या निर्माण कार्यात याची गरज दिसून आली आहे. कमतरतेची लक्षणे 
  • पानावर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.
  • कमतरता प्रथम कोवळ्या पानावर दिसते.
  • लिंबूवर्गीय फळझाडांच्या पानावर तेलकट डाग दिसतात. ज्वारी व बाजरीवर बुरशी येते.
  • तांबे 

  • पिकांच्या जीवनचक्रात कार्यरत असलेल्या विकरांमध्ये तांबे एक मुख्य घटक आहे.
  • नत्र आणि पिष्टमय पदार्थांचे प्रमाण समतोल ठेवण्याचे कार्य तांब्याच्या उपस्थितीत होते.
  • दवबिंदू आणि थंडीपासून बचाव करण्याची शक्ती पिकांमधील तांब्याच्या प्रमाणावर अवलंबून असते.
  • तांबे अप्रत्यक्षरीता प्रकाश संश्लेषण आणि हरितद्रव्य क्रियेत नियंत्रकाचे कार्य करते. कमतरतेची लक्षणे 
  • प्रथम लक्षणे पिकांतील वाढबिंदूवर दिसतात. पाने मुडपतात.
  • पानाच्या शिरांमधील भाग पिवळा, पांढरा पडून पिकांची वाढ खुंटते.
  • लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये मर रोग दिसतो. कांदा आणि भाजीवर्गीय पिकांमध्ये करपा रोग होतो.
  • बोरॉन 

  • हे अन्नद्रव्य पिकांच्या जननक्रियेत भाग घेते. कोष विभाजनाच्या प्रक्रियेत गरज असते.
  • पिष्टमय पदार्थाच्या वहनास चालना मिळते.
  • पाण्याचा पिकांवर होणारा ताण सोसण्यास मदत करते. कमतरतेची लक्षणे 
  • बोरॉनची कमतरता असलेल्या पिकांमध्ये नत्राचे प्रमाण अधिक असते.
  • बोरॉनची कमी हालचाल आणि कमी वाहकता असल्याने पिकांच्या मुळ्यांमधून वरच्या अवयवापर्यंत पोहोचण्याकरिता उशीर लागतो.
  • पानाचे शेंडे काळे पडतात. कोवळी पाने आणि कळ्या गळतात. वाढबिंदूची वाढ खुंटते.
  • पेशी कोष ठिसूळ, कठीण आणि कोरडे होतात. फुले कमी येतात, फळे ठिसूळ होऊन त्यावर भेगा पडतात.
  • मॉलिब्डेनम 

  • नत्र स्थिरीकरण करणाऱ्या सूक्ष्म जिवांची क्रियाशीलता वाढते. कमतरतेची लक्षणे 
  • प्रथिनांची पूर्ण कार्यक्षमता वापरली जात नाही. प्रथिन संश्लेषणाची क्रिया मंदावते. पिकांमध्ये नायट्रेटयुक्त नत्राचे प्रमाण वाढते.
  • पिकांची नत्र शोषण करण्याची शक्ती जाणवते. पिकांची नत्र शोषण करण्याची स्पष्ट लक्षणे फ्लॉवरवर स्पष्ट दिसतात.
  • पानाच्या सर्व बाजूला गेरवा रंग येऊन पाने कोरडी पडतात. अथवा चुरमुडल्यासारखा आकार येतो.
  • फुले-फळे गळायला लागतात. पुष्कळदा दाणे आणि फळेसुध्दा भरत नाहीत.
  • क्लोरीन 

  • प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या वेळी प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी क्लोरीनची गरज असते.
  • प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या माध्यमातून पेशीतील रसाकर्षण दाब उंचावतो आणि पेशीकोषातील आर्द्रता टिकविली जाते. कमतरतेची लक्षणे 
  • क्लोरीनची कमतरता नवीन पानातील पिवळेपणा दर्शविते. पाने निस्तेज होतात.
  • टोमॅटोच्या पानाच्या कडा क्लोरीनच्या कमतरतेमुळे करपतात.
  • सोडिअम  पिकांच्या योग्य वाढीसाठी सोडिअम सूक्ष्म प्रमाणावर आवश्यक आहे. पेशी कोषामध्ये योग्य प्रमाणात आर्द्रता आणि क्षारांचा समतोल साधण्यात सोडिअमचा महत्त्वाचा भाग असतो. कोबाल्ट  नत्रस्थिरीकरण करणाऱ्या द्विदल पिकांसाठी सूक्ष्म प्रमाणात कोबाल्टची गरज असते. हे अन्नद्रव्य मुळ्यांच्या गाठीमध्ये अधिक प्रमाणात दिसून आले. नत्रस्थिरीकरणाचा वेग आणि नत्र स्थिरीकरणाच्या सूक्ष्म जिवाणूंच्या संख्येत वाढ करण्याची क्षमता कोबाल्टमध्ये आहे. मध्यम प्रमाणात लागणारे दुय्यम अन्नद्रव्ये 

    कॅल्शियम 

  • हे अन्नद्रव्य पिकांच्या पेशीच्या आवरणाचा एक घटक असून त्यामुळे पेशींची वाढ चांगली होते.
  • पिके पाण्याचा पुरेपूर उपयोग करून घेतात, पिकांमध्ये ओलावा राहतो.
  • जमिनीचा पोत चांगला राहतो. जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक योग्य राखून पिकांना इतर अन्नद्रव्यांच्या शोषण प्रक्रियेत मदत होते.
  • बीज निर्मितीस चालना मिळते.  कमतरतेची लक्षणे 
  • कोवळ्या पानांवर आणि नवीन अंकुरणाऱ्या शेंड्यावर पहिली लक्षणे दिसतात.
  • पानाच्या कडा फिकट होऊन मागे पुढे मुडपतात. रोपे मुडपल्यासारखी होतात.
  • मॅग्नेशिअम

  • हे अन्नद्रव्य पानातील हरितद्रव्याचा केंद्रीय घटक असून प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेते.
  • पानामध्ये अन्न तयार होऊन रंग येतो. विकरांना क्रियाशील करण्यास मदत करते.
  • प्रथिनांची निर्मिती कर्बोदके व मेद तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे कार्य आहे. कमतरतेची लक्षणे 
  • प्रथम जुन्या आणि नंतर नव्या पालवीस पिवळसर रंग येतो.
  • जुन्या पानाच्या शिरामधील भाग पिवळा पडतो. पानावर हिरवे पिवळे डाग पडतात,त्यानंतर हा भाग तपकिरी होतो. पाने गळून पडतात.
  • गंधक 

  • सर्वाधिक गरज तेलबिया उत्पादनासाठी असते.
  • कर्बोदके, प्रथिने, हरितद्रव्ये आणि ग्लुकोसाईटच्या निर्मितीसाठी सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे.
  • गंधकाच्या प्रमाणशील उपलब्धतेमुळे जीवनसत्त्व ब, लिपोईक आम्ल, फॅरिडॉक्झीन आणि ग्लूईथाईनचे जीवरासायनिक प्रक्रियेचा वेग वाढविण्यास मदत होते. कमतरतेची लक्षणे 
  • पिकाची वाढ खुंटते. प्रथम कोवळी पाने पिवळी पडतात. कोंबांची वाढ खुंटते.
  • पूर्ण परिपक्व आणि जुन्या पानावर पिवळ्या-लाल-नारंगी रंगाची छटा पसरते, ती गळून पडतात.
  • पिकांचे धांडे आणि पानाचे शेंडे कमजोर होऊन शेवटी गळून पडतात. फळधारणा मंदावते.
  • द्विदल धान्यामध्ये नत्रस्थिरीकरण प्रक्रियेचा वेग कमी होतो. फुले कमी आणि वांझ निर्माण होतात.
  •  ः डॉ. हनुमान गरुड, ७५८८६७७५८३     (कृषी विज्ञान केंद्र खामगाव ,जि. बीड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com