agriculture news in Marathi crop harvest cost increased due to diesel price up Maharashtra | Page 2 ||| Agrowon

डिझेल दरवाढीने पीक काढणीचे दर वाढले

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 मार्च 2021

गेल्या काही दिवसांत डिझेलचे दर सातत्याने वाढल्याचा ताण शेतकऱ्यांच्या खिशावर पडू लागला आहे. सध्या गहू, हरभऱ्याची मळणी यंत्राच्या साह्याने केली जात असून यासाठी गेल्या वर्षाच्या तुलनेत खर्चात मोठी वाढ झाली आहे.

अकोलाः गेल्या काही दिवसांत डिझेलचे दर सातत्याने वाढल्याचा ताण शेतकऱ्यांच्या खिशावर पडू लागला आहे. सध्या गहू, हरभऱ्याची मळणी यंत्राच्या साह्याने केली जात असून यासाठी गेल्या वर्षाच्या तुलनेत खर्चात मोठी वाढ झाली आहे. हार्वेस्टरच्या साह्याने होत असलेल्या गव्हाच्या मळणीसाठी एकरी १८०० रुपयांपर्यंत दर द्यावा लागत आहे. 

बेलखेड येथील दादा टोहरे म्हणाले, की डिझेल दर वाढीमुळे आमच्या भागात ट्रॅक्टरच्या मशागतीचे दर वाढले. मागच्या वर्षीच्या ट्रॅक्टर भाड्यात दीड ते दुप्पट दरवाढ केली आहे. वरवट बकाल येथील श्रीकृष्ण ढगे म्हणाले, ‘‘यंदा तुरीच्या खुट्या ट्रॅक्टरने पाडण्यासाठी एकराला सातशे रुपये आकारले जात आहेत. ही परिस्थिती पाहता यापुढील काळात शेतीची कामे शासनाने दर निश्‍चित ठरवून करून देण्याची व्यवस्था उभारली पाहिजे. जशी किमान आधारभूत किंमत ठरविली जाते, तसे दर याचेही असायला हवेत.’’

भोसा येथील नितीन खुरद यांनी सांगितले की, आधी नांगरटी पाचशे रुपये एकर होती. आता सहाशे रुपये द्यावे लागत आहेत. रोटरचा दर सातशेवरून नऊशे झाला आहे. थ्रेशरच्या साह्याने पिकांची काढणी करण्यासाठीचा, मार्केटला शेतमाल नेण्याचाही दर महागला आहे. 

सध्या हरभरा काढणी जोरावर आहे. गव्हाचाही हंगाम काही भागात सुरु झाला आहे. पूर्वीसारखे मजूर कुशल मिळत नसल्याने बहुतांश शेतकरी यंत्राच्या साह्याने काढणीला पसंती देत आहे. यासाठी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंत्राचे भाडे महागले आहे. हार्वेस्टरचा दर वेगवेगळ्या भागात भिन्नभिन्न आकारला जातो. रस्त्याला लागून असलेल्या शेताला आणि आत मधील शेताला वेगळा दर ठरवतात. एकाच ठिकाणी जास्त क्षेत्र असेल तर त्याचाही दर ठरविताना विचार केला जात आहे. अकोल्यात एक फेब्रुवारीला डिझेल ८१.९८ रुपये दर होता. २८ फेब्रुवारीला हाच दर ८७.१५ रुपये लिटर दर बनला. महिनाभरात सहा रुपये दर वाढला. 

खर्च-उत्पन्नाची बरोबरी; स्पर्धेमुळे तोट्याचा धंदा 
तर दुसरीकडे ट्रॅक्टरची संख्या अधिक असलेल्या भागात जेमतेम दरात शेतीची कामे करावी लागत आहेत. तपोवन येथील शेतकरी प्रमोद पाटील म्हणाले, आमच्या भागात सध्या ट्रॅक्टरचे भाडे ५५० ते ६०० रुपये तास आहे. एक तासाच्या कामासाठी ट्रॅक्टरला चार लिटर डिझेल लागते. याचे ३४० रुपये होतात. चालकाचा ५० रुपये तास खर्च आहे. १० रुपये प्रतितास इतर खर्च, असा ४०० रुपये तास सरळसरळ खर्च आहे. त्यातही यंत्राची तुटफूट झाल्यास वेगळे पैसे लागतात. एका तासाला दिडशे ते दोनशे रुपये शिल्लक दिसतात. परंतु त्यातही टायर, इंजिन घसाई, बॅचरी खर्च, बँकेचे कर्ज असल्यास व्यास, डिझेल आणण्याचा खर्च, गावापासून शेतापर्यंत ट्रॅक्टर जाण्याचा खर्च गृहीत धरावा लागेल. याची आकडेमोड केल्यास सध्या मिळणारा दर व होणारा खर्च याची बरोबरीच होत आहे. 

कामाचे दर वाढले 
निंबाजी लखाडे म्हणाले, की नांगरणी आधी हजार रुपये एकर होती. आता १२०० रुपये झाली. वखरणी पंजीसाठी ५०० ऐवजी ६०० रुपये तास घेतला जात आहे. पेरणी ६०० वरून ७०० तर हार्वेस्टर १२०० वरून १५०० रुपये दर आकारत आहे. मळणी यंत्राने हरभरा काढताना १२० रुपयांऐवजी १५० रुपये पोत्याला आकारतात. 
 


इतर अॅग्रो विशेष
चैत्री यात्राही यंदा प्रतिकात्मक...सोलापूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍...
अवजारे उद्योगावर मंदीचे ढग पुणेः राज्यात पाच अब्ज रुपयांची उलाढाल करणाऱ्या...
फळे, भाजीपाला थेट पणन परवान्याला ६...पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमालाचे नुकसान होऊ नये...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
क्यूआर कोड रोखणार हापूसमधील भेसळ रत्नागिरी ः बाजारपेठेमध्ये ‘हापूस’ची कर्नाटक...
जालन्यात वर्षभरात ४२९ टन रेशीम कोष...जालना : येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे : आठवडाभर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ...
भाजीपाला विकण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान...कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन...
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
कोविडला नैसर्गिक आपत्ती घोषित करा ः...मुंबई ः राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्‍...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
कडवंचीचे द्राक्ष आगार तोट्यात जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून ओळख...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारांनी...पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून मध्य...
सोयाबीन बियाणे वाहतुकीसाठी अट पुणे : सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी वाहतूक...
काळ्या गव्हाच्या लागवडीची...नाशिक : काळ्या गव्हामध्ये पौष्टिकता, औषधी गुणधर्म...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
विदर्भात आज पावसाची शक्यता पुणे : मागील आठ दिवसांपासून वादळी पावसाने अनेक...
आवारात गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी...पुणे : ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत कोरोना...
पुणे बाजार समिती शनिवार-रविवार बंद; इतर...पुणे : पुणे बाजार समिती सोमवार ते शुक्रवार...