agriculture news in marathi, crop harvest experiments status, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात खरिपात पीक कापणीचे साडेतीन हजार प्रयोग 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

नगर  ः खरिपातील पिकांची उत्पादकता निश्चित करण्यासाठी जिल्हाभरात सुमारे ३६१८ पीक कापणी प्रयोग करण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्यातील ही प्रयोग झाले आहेत. या प्रयोगातून पीक उत्पादकता निश्चित होणार असल्याचे सांगण्यात आले. 

नगर  ः खरिपातील पिकांची उत्पादकता निश्चित करण्यासाठी जिल्हाभरात सुमारे ३६१८ पीक कापणी प्रयोग करण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्यातील ही प्रयोग झाले आहेत. या प्रयोगातून पीक उत्पादकता निश्चित होणार असल्याचे सांगण्यात आले. 

खरीप व रब्बीत घेतल्या जाणाऱ्या पिकांची उत्पादकता निश्चित करण्यासाठी पीक कापणी प्रयोग केले जातात. यंदा खरिपासाठी जिल्ह्यात कृषी विभागाने उडीद, मूग, बाजरी जिरायती व बागायती, खरीप ज्वारी, तीळ, सूर्यफूल, मका, सोयाबीन, भात जिरायती व बागायती, भुईमूग, कापूस या पिकांचे मिळून सुमारे ३६१८ पीक कापणी प्रयोग करण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक महसूल मंडळातील सहा गावांमध्ये हे प्रयोग केले जात असून एका गावांत दोन याप्रमाणे बारा प्रयोग केले जात आहेत. कृषी विभागासोबत महसूल व जिल्हा परिषद विभागाचीही यासाठी मदत घेतली जात आहे. सध्या पिकांनुसार प्रयोग करण्याचे काम सुरू असून पीक कापणी प्रयोग पूर्ण झाल्यावर उत्पादकता निश्चित केली जाणार आहे.

जिल्ह्यात उडदाचे ११६, मुगाचे २३६, जिरायत बाजरीचे ११६४ तर बागायती बाजरीचे ५२, खरीप ज्वारीचे ७२, सूर्यफुलाचे १८, तिळाचे १८, मकाचे ११०, सोयाबीनचे २६२, जिरायत भाताचे ९६, भुईमुगाचे २७०, कापसाचे ७७० व तुरीचे ४३४ पीक कापणी प्रयोग होणार आहेत असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...