Agriculture news in marathi, Crop harvesting experiment at Kharip in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यातील खरिपात २ हजारांवर पीक कापणी प्रयोग
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामामध्ये २ हजार १०५ पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले आहे. मुगाचे पीक कापणी प्रयोग सुरू झाले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामामध्ये २ हजार १०५ पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले आहे. मुगाचे पीक कापणी प्रयोग सुरू झाले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात यंदा ७ लाख ५१ हजार २२२ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली. त्यांची प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यासाठी कृषी, महसूल, जिल्हा परिषद या तीन यंत्रणांमार्फत २ हजार १०५ पीक कापणी प्रयोग घेण्यात येतील. यामध्ये मुगाचे १४४ , उडदाचे २१०, तुरीचे १६२, सोयाबीनचे ४८०, कपाशीचे ४६२, ज्वारीचे १७७, बाजरीचे ३०, भाताचे १४४, भुईमुगाचे ३२, कारळाचे ३२, तिळाचे १४४ , पूर्व हंगामी उसाचे २६, खोडवा उसाचे ३२, सुरू उसाचे ३० प्रयोग घेण्यात येतील. 

मुगाचे पीक कापणी प्रयोग सुरू झाले आहेत. यंत्रणानिहाय पीक कापणी प्रयोगाची विभागणी केली असता कृषी विभागामार्फत एकूण  ६८८ पीक कापणी प्रयोग घेण्यात येतील. यामध्ये भाताचे ४६, ज्वारीचे ६१, बाजरीचे ४, तुरीचे ५८, उडदाचे ७४ , मुगाचे ५१, भुईमुगाचा १, कारळाचे १०, तिळाचे ४५, सोयाबीनचे १६०, कपाशीचे १५४, पूर्व हंगामी उसाचे २, सुरू उसाचे १२ आणि खोडवा उसाचे १० प्रयोग होतील. 

जिल्हा परिषदेतर्फे एकूण ६३७ पीक कापणी प्रयोग होतील. यामध्ये भाताचे ३९, ज्वारीचे ५८, बाजरीचा १, तुरीचे ४९, उडदाचे ६६, मुगाचे ४२, भुईमुगाचे ६, कारळाचे १८, तिळाचे ५७, सोयाबीनचे १६०, कपाशीचे १५४ , पूर्व हंगामी उसाचे ६, खोडवा उसाचे १५, तर सुरू  उसाचे १५ प्रयोग होतील. 

महसूल विभागातर्फे एकूण ७८० प्रयोग घेण्यात येतील. त्यामध्ये भाताचे ५९, ज्वारीचे ५८, तुरीचे २५, उडदाचे ५१, भुईमुगाचे २५ , कारळाचे १८, तिळाचे ५७, सोयाबीनचे १६०, कपाशीचे १५४, पूर्व हंगामी उसाचे १८, खोडवा ऊस आणि सुरू उसाचे प्रत्येकी १५ प्रयोग होतील, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...