नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखा

नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखा
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखा

किनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (ता. किनवट) मंडळामध्ये गुरुवारी (ता. २१) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे काढणीस आलेल्या तसेच काढणी सुरू असलेल्या गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले. 

गुरुवारी सायंकाळी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने बोधडी बु.(ता. किनवट) परिसरातील जवळपास दहा गावांना अक्षरक्ष: झोडपून काढले. बोधडी बु., बोधडी खुर्द, पार्डी खुर्द, वाळकी, सावरी, थारा, दिग्रस, धानोरा या ठिकाणी प्रचंड वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. परिसरातील काही गावात तुरळक ठिकाणी गारपीट झाली. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, काढणीस आलेल्या तसेच काढणी सुरू असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. 

सुमारे १०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील गहू आणि हरभरा पिकांना गारपिटीचा तडाखा बसला. जवळपास शंभर हेक्टरच्यावर गहू व हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. गारपीट नुकसानीचे सर्वेक्षण केले जाणार आहे, असे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com