agriculture news in Marathi, crop inspection in Kolhapur on action mode, Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास सुरवात
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

आम्ही मोहीम स्वरूपात पंचनामे सुरू केले आहेत. बाहेरुन मनुष्यबळ आणून पंचनामे करत आहोत. येत्या चार दिवसांत ९५ टक्क्यांपर्यंत पंचनामे निश्‍चित पूर्ण होतील. या दृष्टीने दररोज कामकाजाचा आढावा घेण्यात येत आहे. 
- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर
 

कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता पंचनाम्यासाठी शासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे. महसूल खात्याबरोबर कृषी विभागानेही पंचनाम्यासाठी कंबर कसली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मोहीम स्वरूपात पंचनामे केले जात आहे. यासाठी कृषी विभागाने बाहेरुन कर्मचाऱ्यांची कुमक मागविली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कृषी सहायकांपासून सर्व कर्मचाऱ्यांना आता गावे वाटून देण्यात आली असून येत्या चार दिवसांत जिल्ह्यातील संपूर्ण पंचनामे पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याने सांगली व सातारा जिल्ह्यांतील पूर्व भागातील कृषी विभागाचे ९६ कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात बोलाविले जात आहेत. जिल्हा अधीक्षक कार्यालयामार्फत प्रत्येक कर्मचाऱ्याला तालुक्‍यात पाठवून तेथून तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत या कर्मचाऱ्यांना गावे वाटून दिली जात आहेत. ज्या ठिकाणी नुकसान जास्त आहे. अथवा त्या गावाला चहूबाजूंनी पाण्याने वेढले गेले होते. तिथे एका कर्मचाऱ्यांकडून पंचनामे करणे अशक्‍य बनल्याने प्रसंगी दोन ते तीन कर्मचाऱ्यांकडे त्याची जबाबदारी दिली जात आहे. 

दररोज संध्याकाळी कोणत्या गावातून किती पंचनामे केले याची माहिती संकलित केली जात आहे. यानुसार येत्या चार दिवसांत पूर्ण जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाची धडपड सुरू आहे. जिल्ह्यातील बहुतांशी कर्मचारी पंचनाम्यासाठी बाहेर पडल्याने आता कृषी विभागाची कार्यालये ओस पडली आहे. सध्या शासनाकडून तातडीने पंचनाम्याची मागणी होत असल्यने याच कामाला प्राधान्य दिले जात आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या बुडीत क्षेत्राची माहिती तातडीने कृषी विभागला द्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

इतर बातम्या
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...