परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून ६८ हजार हेक्टरचा पीकविमा

परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून ६८ हजार हेक्टरचा पीकविमा
परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून ६८ हजार हेक्टरचा पीकविमा

परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत यंदाच्या खरिपासाठी बुधवारपर्यंत (ता.१७) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १ लाख २५ हजार १५८ विमा प्रस्ताव सादर केले. त्यांनी ६८ हजार २ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले. त्यासाठी ५ कोटी ४४ लाख १४ हजार ८४१ रुपयांचा विमा हप्ता भरला, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी बुधवारपर्यंत जनसुविधा केंद्रांवर (सीएसी) १ लाख २३ हजार ९९६ विमा प्रस्ताव दिले. त्यासाठी ५ कोटी ३३ लाख ३९ हजार ५५० रुपयांचा विमा भरला. एकूण ६७ हजार १२ हेक्टरवरील पिके विम्याव्दारे संरक्षित केली. जिल्ह्यातील बॅंकांमध्ये शेतकऱ्यांनी ८९८ विमा प्रस्ताव सादर केले. या ठिकाणी ९ लाख २० हजार ३४८ रुपये विमा हप्ता भरून ८०६ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले. राष्ट्रीय पीकविमा पोर्टलवर शेतकऱ्यांनी वैयक्तिकरीत्या २६४ विमा प्रस्ताव सादर केले. १ लाख ५४ हजार ९४२ रुपये विमा हप्ता भरला. १८४.२८ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले.

पीकविमा संरक्षण घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना येत्या बुधवारपर्यंत (ता.२४ ) बॅंका, सामुदायिक सेवा केंद्र (सीएसीसी), वैयक्तीकरीत्या ऑनलाईन पीकविमा प्रस्ताव सादर करता येतील. बॅंका, सीएससीच्या ठिकाणी गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी विमा प्रस्ताव सादर करावा, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

तालुकानिहाय पीकविमा स्थिती

तालुका  पीकविमा प्रस्ताव
परभणी २०७११
जिंतूर ४२४९
सेलू  १७४१३
मानवत २४६४२
पाथरी  १२६०७
सोनपेठ ५९६२
गंगाखेड १२७१५
पालम २००९१
पूर्णा  ६७६८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com