परभणीत पीकविमा योजनेअंतर्गत ८ लाख ४३ हजारांवर प्रस्ताव

पीकविमा योजनेअंतर्गत ८ लाख ४३ हजारांवर प्रस्ताव
पीकविमा योजनेअंतर्गत ८ लाख ४३ हजारांवर प्रस्ताव

परभणी ः यंदा खरीप हंगामात परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत ८ लाख ४३ हजार ४०४ पीकविमा प्रस्ताव सादर केले आहेत. एकूण ४ लाख ४६ हजार ५७१ हेक्टरवरील खरीप पिकांसाठी विमा कवच घेतले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकूण ३५ कोटी ९६ लाख २ हजार ९८९ रुपये एवढा विमा हप्ता कंपनीकडे भरला आहे, याबाबत कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

गतवर्षी (२०१८-२०)च्या तुलनेत यंदा पीकविमा प्रस्तावांची संख्या २ लाख ६६ हजार ८८९ ने, तर विमा हप्त्याच्या रकमेमध्ये १० कोटी ३४ लाख १६ हजार ३८९ रुपयांनी वाढ झाली आहे.

यंदाच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात ५ लाख ३३ हजार ५३९ हेक्टरवर पेरणी झाली. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत ४ लाख ४६ हजार ५७१ हेक्टरवरील पिकांसाठी १५८० कोटी ४० लाख ९० हजार ३८९ रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे.

सर्व नऊ तालुक्यांतील शेतकऱ्यांनी जनसुविधा केंद्र, बॅंका, तसेच शेतकरी विमा पोर्टलवर वैयक्तिकरीत्या विविध पिकांसाठी एकूण ८ लाख ४३ हजार ४०४ विमा प्रस्ताव सादर केले आहेत, त्यासाठी शेतकऱ्यांनी ३५ कोटी ९६ लाख २ हजार ९८९ रुपये एवढा विमा हप्ता भरला आहे. पीकनिहाय विमा संरक्षित क्षेत्राची माहिती विमा कंपनीने अद्याप सादर केलेली नाही, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

तालुकानिहाय प्रस्ताव, हप्ता रक्कम (कोटी रुपये), संरक्षित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका  विमा प्रस्ताव  विमा हप्ता  संरक्षित क्षेत्र
परभणी ११३३३३ ६.५११९ ८०५१६.६५
जिंतूर  १२४०१६ ४.५४२२ ५८५१९.७८
सेलू  ९८७५९ ४.०४२४ ४९३५१.९९
मानवत  ५५४६० ३.१२६९ ३८६५६.०८
पाथरी  ७८२२४ ३.५८२८ ४२९५३.९१
सोनपेठ  ५७८८० ४.०४४२ ३२२०३.२
गंगाखेड  १२५१८३ ४.४४७८ ५६९९९.७६
पालम  १०६२७२ ३.५३२८ ४३१३५.३८
पूर्णा  ८४२७७ ३.५७९८ ४४२३४.३४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com