आंबिया बहरातील पीकविमा  परताव्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा 

अमरावती जिल्ह्यातील १६ हजार ८१७ शेतकऱ्यांनी आंबिया बहराकरिता फळपीक विमा काढला होता. भरपाई संदर्भातील निकषांची पूर्तता केल्यानंतरही या शेतकऱ्यांना अद्यापही विमा परतावा मिळाला नाही.
आंबिया बहरातील पीकविमा  परताव्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा  Crop insurance in Ambia Bahra Waiting for farmers to return
आंबिया बहरातील पीकविमा  परताव्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा  Crop insurance in Ambia Bahra Waiting for farmers to return

अमरावती : जिल्ह्यातील १६ हजार ८१७ शेतकऱ्यांनी आंबिया बहराकरिता फळपीक विमा काढला होता. भरपाई संदर्भातील निकषांची पूर्तता केल्यानंतरही या शेतकऱ्यांना अद्यापही विमा परतावा मिळाला नाही. त्यामुळे परतव्याची प्रतीक्षा केव्हा संपणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.  अमरावती जिल्ह्यात नागपुरी संत्र्याखालील सर्वाधिक क्षेत्र आहे. राज्याच्या एकूण १ लाख ५० हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी विदर्भात सुमारे १ लाख २५ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यातील सर्वाधिक एक लाख हेक्‍टरच्या आसपास क्षेत्र हे एकट्या अमरावती जिल्ह्यात आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून संत्रा उत्पादकांना नैसर्गीक आपत्तीचा सामना करावा लागत असल्याने अपेक्षीत उत्पाकदता आणि उत्पन्न मिळत नसल्याची स्थिती आहे. शासनाकडून देखील भरपाईबाबत निर्णय होत नसल्याने शेतकरी फळपीकविम्याच्या माध्यमातून काहीतरी परतावा मिळेल, या अपेक्षेत राहतात. त्यामुळेच फळपीक विमाधारकांची संख्यादेखील वाढीस लागली आहे. २०२०-२१ या वर्षात १६ हजार ८१७ शेतकऱ्यांनी १६२८२ हेक्‍टर क्षेत्र संरक्षित केले होते. त्यामध्ये संत्रा, मोसंबी व केळी या पिकांचा समावेश होता. आंबिया बहर फळपीक विम्याचे निकष व ट्रिगर ३१ मे रोजी संपले. त्यानंतर आता तीन महिने पूर्ण झाल्यानंतरही भरपाई संदर्भाने काहीच हालचाली नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. संततधार पाऊस, गारपीटमुळे आंबिया बहराचे चांगलेच नुकसान झाले. त्याची दखल घेत विमा परतावा खात्यात जमा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

प्रतिक्रिया  शासनाने आंबिया बहर फळपीक योजनेचा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करुन दिलासा देण्याची गरज आहे. पाऊस, विविध कीड-रोग यामुळे फळपीक उत्पादक जेरीस आले आहेत. विमाधारक शेतकऱ्यांचा अंत न पाहता लवकरात लवकर आंबिया बहराची रक्‍कम मिळावी, अशी मागणी आहे.  -पुष्पक खापरे, जिल्हास्तरीय शेतकरी पीकविमा प्रतिनिधी  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com