agriculture news in Marathi crop insurance companies denied work on old criteria Maharashtra | Agrowon

जुन्या निकषांनुसार कामाला विमा कंपन्यांचा नकार; मुख्यमंत्र्यांसमोर जाणार प्रश्न

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

जुन्या निकषानुसार केळी पिकासाठी काम करण्यास विमा कंपन्यांनी हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत काम करण्यास नकार दिला.

जळगाव: जुन्या निकषानुसार केळी पिकासाठी काम करण्यास विमा कंपन्यांनी हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत काम करण्यास नकार दिला. विमा कंपन्या, शेतकरी व शासन यांची एक संयुक्त बैठक गुरुवारी (ता.२२) झाली. यात शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी जुने म्हणजेच २०१९-२० चे निकष लागू करण्याची मागणी केली. 

या बैठकीत जळगाव, धुळे जिल्ह्यातील शेतकरी ‘व्हीसी’द्वारे सहभागी झाले. बैठकीत कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, सहा विमा कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी प्रकाश पाटील, एस.बी.पाटील, सत्वशील पाटील, अमोल पाटील, विशाल महाजन आदी सहभागी झाले. 

शेतकऱ्यांनी विविध मुद्दे मांडले. त्यात यंदा विमा संरक्षित निधी निम्मा करा, पण जुने निकष लागू करा. २८ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने जे पत्र राज्याला दिले, ते रद्द करावे. विमा कंपन्या काम करीत नसतील तर शासकीय विमा संस्था व शासन यांनी ही योजना राबवावी. तसे शक्य नसले तर शासनाने थेट निधी अनुदान म्हणून केळी उत्पादकांना द्यावा. यंदा चार हेक्टरपर्यंतच क्षेत्राला विमा संरक्षण घेण्याची अट योग्य नाही. जियो टॅगिंग पध्दतीने काम करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

२०११ पासून विमा योजना आहे. पण दरवर्षी निकष बदलले आहेत. यंदा लागू केलेले परतावा निकष वस्तुस्थितीनुसार नाहीत. त्यानुसार शेतकरी योजनेचे सहभागी होणार नाहीत, योजनेवर बहिष्कार टाकू, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. यावर ‘एनडीआरएफ’मधून मदत देता येईल का, यावर विचार करू, मुख्यमंत्री यांच्याकडे सर्व मुद्दे ठेवू, असे स्पष्टीकरण आयुक्त डवले यांनी दिले. 
 


इतर अॅग्रो विशेष
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...
कमी कालावधीत पक्व होणारे मधुर कलिंगड...नाशिक : बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन...
किमान तापमानात घट होणार पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार...
डाळिंब दरात मोठी सुधारणासांगली ः राज्यातील डाळिंब पीक यंदा सततचा पाऊस आणि...
पामतेल आयात शुल्कात कपात; केंद्र...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने कच्च्या...
टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...
'निवार’ चक्रीवादळाचा प्रभाव; राज्यात...पुणे ः बंगालच्या उपसागरात पूर्व किनाऱ्याकडे...
केळीची मागणी कायम, दर टिकून जळगाव : दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर...
तमिळनाडू, पुद्दुचेरीत धुमाकूळचेन्नई  ः निवार चक्रीवादळामुळे वेगवान...
गहू, हरभरा पेरणीला वेगपुणे : यंदा चांगल्या पाणीसाठ्यामुळे गहू व...
पहिल्याच टप्प्यात थकवली ३५० कोटींची ‘...पुणे : राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर...
आर्थिक चणचण,‘लम्पी’चे पशुधन बाजारावर...सांगली ः लॉकडाउनमुळे पशुधानाचे आठवडे बाजार तब्बल...
ऊसतोडणी मजुरांची संख्या यंदा दोन...नगर : राज्यातील साखर कारखान्यांवर ऊसतोडणी...
पणन महासंघाची खरेदी उद्यापासूननागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
मराठवाड्यातील बहुतांश धरणे तुडुंबऔरंगाबाद : यंदा जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील...
संकटकाळात श्री ब्रॅण्डद्वारे दर्जेदार...नाशिक जिल्ह्यातील वनसगाव येथील शैलेश व संदीप या...
सणांच्या हंगामात भाव खाणारी गाडे यांची...कांजळे (ता. भोर, जि. पुणे) येथील विलास गाडे यांनी...
महाटीत उपसरपंचपदासाठी साडेदहा लाखांची...नांदेड ः ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी उपसरपंचपदाचा...
राज्यात शनिवारपासून ‘जनप्रबोधन यात्रा’नगर/पुणे ः शेतकरी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या...