agriculture news in Marathi crop insurance companies got five thousand crore Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पाच हजार कोटींचा विमा कंपन्यांना नफा 

मनोज कापडे
शनिवार, 15 मे 2021

राज्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचे कवच देण्याच्या नावाखाली खासगी विमा कंपन्या कशा मालामाल होतात हे पुन्हा सिद्ध झाले आहे. गेल्या हंगामात या कंपन्यांना पाच हजार कोटी रुपयांच्या आसपास नफा झाला आहे.

पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचे कवच देण्याच्या नावाखाली खासगी विमा कंपन्या कशा मालामाल होतात हे पुन्हा सिद्ध झाले आहे. गेल्या हंगामात या कंपन्यांना पाच हजार कोटी रुपयांच्या आसपास नफा झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. 

राज्यातील शेतकरी, राज्य व केंद्र शासनाच्या तिजोरीतून या कंपन्यांनी विमा हप्त्यापोटी गोळा केलेल्या रकमा व प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वाटलेली नुकसान भरपाई याची आकडेवारी तपासल्यानंतर कंपन्यांच्या नफेखोरीवर प्रकाश पडतो. अब्जावधी रुपयांचा नफा कमावणाऱ्या या विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यात टाळाटाळ करण्यात येते. त्यासाठी कृषी आयुक्त धीरज कुमार यांना या कंपन्यांना वारंवार नोटिसा पाठवाव्या लागत आहेत. 

‘‘पीकविम्यातील नफेखोरीबाबत राज्य शासन देखील गांभिर्याने विचार करीत असून अन्य पर्याय शोधण्याच्या तयारीत आहे. कृषी सचिव एकनाथ डवले यांना पीकविम्याचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना मिळावा असे वाटते आहे. विम्याच्या सध्याच्या कामकाजावर कृषिमंत्री दादा भुसे यांनाही सुधारणा हवी आहे. याबाबत केंद्राकडे सुधारणा सूचविण्यात आल्या आहेत. मात्र, त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही,’’ अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. 

दरम्यान, विमा कंपन्यांच्या नफ्याला पायबंद घालण्यासाठी राज्याच्या कृषी खात्यात सध्या जोरदार तयारी सुरू झाली आहे. केंद्राकडे एका बाजूने विमा योजनेतील सुधारणेचे उपाय पाठवताना दुसऱ्या बाजूने विमा कंपन्यांना कायदेशीर कारवाईच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. ‘‘पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी असली तरी त्यात शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांचाच अफाट फायदा होत असल्याची बाब लपून राहिलेली नाही. तथापि, ही नफेखोरी थांबविण्यासाठी राज्य शासन हतबल आहे. केंद्र शासनाने नियमावली बदलल्याशिवाय ही नफेखोरी थांबणार नाही,’’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

असा चालतो विमा कंपन्यांचा
धंदा (हंगाम २०२०-२१) 

१.१९ कोटी 
सहभागी शेतकरी 
६४.८५ लाख हेक्टर 
संरक्षित क्षेत्र 
५८०१ कोटी 
वसूल विमा हप्ता 
१२.३० लाख 
शेतकऱ्यांना भरपाई 
८२३ कोटी 
भरपाई वाटली 
४९६९ कोटी 
कंपन्यांना नफा 
 


इतर अॅग्रो विशेष
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून...
राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
धरणक्षेत्रांत पावसाचा जोर पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या...
सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात...जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची...
मॉन्सूनची वाटचाल सुरूच पुणे : उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे...
विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘...नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे...
कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक...पुणे ः सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या...
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार...
दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले...पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल...
कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या...
‘डीएससी’अभावी हजारो कोटी पडून पुणे ः पंधराव्या वित्त आयोगाचा पाच हजार कोटी...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
विदर्भात पावसाचा जोर पुणे : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील...
लिंबे तोडणीलाही महाग अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका...
मॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात पुणे ः दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना...