Agriculture News in Marathi Of crop insurance company Bear movement against | Agrowon

नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे आंदोलन 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 सप्टेंबर 2021

मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा कंपनीचा मनमानी कारभार थांबवून मुखेड तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. २२) करण्यात आली.

नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा कंपनीचा मनमानी कारभार थांबवून मुखेड तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. २२) करण्यात आली. संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करून तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 
इफ्को टोकियो पीकविमा कंपनीच्या पंचनामे करणाऱ्या थर्ड पार्टीच्या मुलांची पात्रता नाही. शासन नियमानुसार नुकसानीचे मूल्यांकन निश्‍चित करण्यासाठीचा अनुभव व शैक्षणिक पात्रता त्यांच्याकडे नाही.

पीकविमा कंपन्यांनी निकषानुसार पर्यवेक्षकांची नियुक्ती करावी. विमा कंपनीकडून भरती करण्यात आलेल्या अपात्र प्रतिनिधीची नियुक्ती रद्द करावी. या सोबतच मुखेड तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात आल्यामुळे सरसकट पीकविम्याचा लाभ द्या, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांनी केली. 

या वेळी पंचायत समिती सदस्य जे. बी. कांबळे, बालाजी वडजे, व्यकंट पाटील इंगळे, रमाकांत पाटील जाहूरकर, वैभव पाटील राजूरकर, योगेश पाटील जांभळीकर, माधव पाटील खदगावे, रामदास वाघमारे, पंढरी कांबळे, नागेश शिंदे, बालाजी राजूरवाड, नवनाथ पाटील तारदडकर, शिवाजी इंगळे, रणजित कदम, माधव घाटे, व्यंकट इंगळे, बालाजी इंगळे, राहुल देशमुख, बजरंग हिवराळे, निशिकांत हिवराळे आदी शेतकरी उपस्थित होते. 


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...