विमा कंपनी १० हजार शेतकऱ्यांना देणार भरपाई

crop insurance
crop insurance

पुणे ः विमा हप्ता भरूनही नुकसान भरपाई न मिळालेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीसमोर गुरुवारी (ता.१९) येथे पुन्हा आंदोलन केले. त्यानंतर विमा कंपनीने १० हजार ५४३ शेतकऱ्यांना येत्या चार ते पाच दिवसांत विम्याची रक्कम देणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.     खरीप २०१८ च्या हंगामात पीकविमा हप्ता भरूनही भरपाई न मिळाल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली मागील सहा महिन्यांपासून सतत आंदोलन करत आहेत. गुरुवारी (ता.१९) पुन्हा सुमारे १२०० शेतकरी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या पुण्यातील क्षेत्रीय कार्यालयावर धडकले होते. गेल्या महिन्यात १३ ते १९ या कालावधीत सुमारे चारशे शेतकऱ्यांनी कंपनीच्या क्षेत्रीय कार्यालय समोर मुक्काम सत्याग्रह आंदोलन केले होते.  त्या वेळी १७ हजार ८५१ शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्यात आली होती. उर्वरित शेतकऱ्यांच्या थकीत भरपाईबाबत २८ नोव्हेंबरपर्यंत तोडगा काढू, असे आश्वासन पीकविमा कंपनीने त्या वेळी दिले होते. परंतु, त्या संदर्भात अद्याप कुठलीही कारवाई न झाल्यामुळे गुरुवारी सुमारे बाराशे शेतकरी बीड जिल्ह्यातील विविध गावांतून किसान सभेच्या नेतृत्वाखाली ओरिएंटल इन्शुरन्सच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर दाखल झाले होते. किसान सभेचे बीड जिल्हा समितीचे सदस्य अॅड. अजय बुरांडे म्हणाले, की आज (गुरुवारी) दहा हजार ८२४ शेतकऱ्यांचा भरपाई मिळाल्यामुळे आपण तूर्तास आंदोलन स्थगित करत असलो तरी हे आंदोलन इथेच थांबणार नाही. तर हा केवळ आंदोलनाचा दुसरा टप्पा आपण पूर्ण केला आहे. परंतु पीकविम्याचे आंदोलन सर्व वंचित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची भरापाई मिळेपर्यंत थांबणार नाही. आंदोलकांना दिले लेखी पत्र पीकविमा कंपनी व आंदोलक शेतकऱ्यांमध्ये झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर दहा हजार ८२४ शेतकऱ्यांना सुमारे २३ कोटी ९७ लाख ६२ हजार ६१५ रुपये पीक नुकसान भरपाई मंजुरीसाठी अग्रेषित करण्यात आले. तसे लेखी पत्र विमा कंपनीने आंदोलक शेतकऱ्यांना दिले. परंतु, बीड जिल्ह्यातील एकूण एक लाख सात हजार वंचित शेतकऱ्यांपैकी केवळ ४६ हजार शेतकऱ्यांचे पीकविमा अर्ज पडताळून झाले आहेत. उर्वरित ६३ हजार शेतकऱ्यांच्या अर्जाची पडताळणी पुढील तीन आठवड्यांत पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल, असे लेखी आश्वासन कंपनीने दिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com