पीकविमा कंपनीसोबत प्रशासनाचे साटेलोटे : प्रसेनजित पाटील

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीकविम्यासाठी जळगाव जामोद येथे एल्गार संघटना सातत्याने आंदोलने करीत आहे. मंगळवारी (ता. २२) बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर प्रशासनानेआंदोलकांना स्थानबद्ध केले.
 पीकविमा कंपनीसोबत  प्रशासनाचे साटेलोटे : प्रसेनजित पाटील With crop insurance company Satelote of administration: Prasenjit Patil
पीकविमा कंपनीसोबत  प्रशासनाचे साटेलोटे : प्रसेनजित पाटील With crop insurance company Satelote of administration: Prasenjit Patil

बुलडाणा : शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीकविम्यासाठी जळगाव जामोद येथे एल्गार संघटना सातत्याने आंदोलने करीत आहे. मंगळवारी (ता. २२) बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर प्रशासनाने दडपशाही करीत आंदोलकांना स्थानबद्ध केले. हा प्रकार विमा कंपनी व प्रशासनाचे साटेलोटे असल्यासारखा आहे, असा आरोप या वेळी संघटनेचे संस्थापक प्रसेनजित पाटील यांनी केला.

पीकविम्याच्या मागणीसाठी एल्गार संघटनेने प्रशासनासोबत चर्चा केली. कित्येक निवेदने दिली. ४ फेब्रुवारीला हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतकरी खुंट मोर्चा काढण्यात आला. या वेळी प्रशासनाला पीकविमा मंजूर करण्यासाठी ११ दिवसांचा वेळ दिला होता.

शासन स्तरावर कार्यवाही चालू असल्यामुळे १५ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेले बेमुदत आंदोलन करू नये, असा आग्रह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केली होती. त्याचा मान राखत आणखी आठ दिवसांचा वेळ एल्गार संघटनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला.

तरीही काही न झाल्याने मंगळवारी बेमुदत ठिय्या आंदोलन उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरू केले. आंदोलनाला सुरुवात झाली असताना पोलिस प्रशासनाने कोविड-१९च्या नियमांचे कारण पुढे करीत संस्थापक अध्यक्ष प्रसेनजित पाटील यांच्यासह पदाधिकारी तथा आंदोलक शेतकऱ्यांना स्थानबद्ध केले. 

प्रशासन पीकविमा कंपनीसोबत साटेलोटे करीत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप पाटील यांनी केला. कोणत्याही परिस्थितीत पीकविमा मंजूर होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी घोषणा करण्यात आली. विजय पोहनकर, अजहर देशमुख, संतोष देशमुख, विजय वाघ, शरद कोकाटे, संजय देशमुख, श्रीराम फाळके, भागवत कोकाटे, अनंता कोकाटे, परशराम येऊल, राजू पाटील अवचार, रवी धुळे, बंडू पाटील, आशिष वायझोडे, नितीन कोकाटे, उल्हास कोकाटे, विजय वाघ, तुकाराम गटमने, सुरेश वायझोडे यांच्यासह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com