पीकविमा तक्रारी पोहोचल्या दोन लाखांवर

हवालदील शेतकऱ्यांकडून पीकविमा तक्रारींवर भर दिला जात आहे. पाच जिल्ह्यांत सुमार २ लाख ६३ हजारांवर तक्रारी आजवर दाखल झाल्या आहेत.
Crop insurance complaints reached over two lakh
Crop insurance complaints reached over two lakh

अमरावती ः पावसामुळे विदर्भात पुरती दाणादाण उडाली असून, शेतकऱ्यांचे डोळे शासकीय मदतीकडे लागले आहेत. प्रशासनाकडून सर्व्हेक्षण व पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असली, तरी यापूर्वी सर्व्हेक्षण झाले असेल किंवा मदत मिळाली असेल अशा भागात दुबार सर्व्हेक्षण होणार नाही, अशी भूमिका प्रशासनाची आहे. त्यामुळे हवालदील शेतकऱ्यांकडून पीकविमा तक्रारींवर भर दिला जात आहे. पाच जिल्ह्यांत सुमार २ लाख ६३ हजारांवर तक्रारी आजवर दाखल झाल्या आहेत.

विदर्भात सोयाबीन कापणीला आले असताना अनेक भागांत अतिवृष्टी, ढगफुटीचे प्रकार घडले आहेत. अनेक शिवारे जलमय झाली. परिणामी, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. सोयाबीन डागाळल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे. प्रशासनाकडून सर्व्हेक्षण व पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु पावसाची संततधार कायम असल्याने यापूर्वी सर्व्हेक्षण व पंचनामे झाले असतील अशा भागात दुबार ही प्रक्रिया राबविली जात नाही, असे प्रशासनाने सांगितले आहे. 

त्यामुळे प्रशासनाकडून दुबार सर्व्हेक्षण होणार नाही याची खात्री झालेले शेतकरी विमा भरपाई मिळेल या प्रतीक्षेत आहेत. याच कारणामुळे अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांना ऑनलाइन माहिती देण्यावर शेतकऱ्यांचा भर वाढला आहे. गेल्या आठवडाभरात २ लाख ६३ हजार ६५३ तक्रारी करण्यात आल्या आहेत. दरदिवशी हा आकडा वाढता असल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाकडून विमा भरपाईसंदर्भात काय निर्णय होतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com