Agriculture news in marathi Crop insurance found in town; Fight for credit | Page 3 ||| Agrowon

नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी चढाओढ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या वर्षीच्या खरिपातील पिकांच्या नुकसानी बद्दल नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साडेआठ कोटी रुपयांचा पीकविमा जाहीर झाला आहे.

नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या वर्षीच्या खरिपातील पिकांच्या नुकसानी बद्दल नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साडेआठ कोटी रुपयांचा पीकविमा जाहीर झाला आहे. मात्र आता मिळालेल्या पीकविम्याचे श्रेय घेण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. पीकविमा कसा मिळाला, या बाबत पत्रकबाजी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी खरिपात पंतप्रधान पीकविमा योजनेतून ४ लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी २ लाख ५९ हजार हेक्टर क्षेत्रावर विमा उतरला होता. गेल्या वर्षी नगर जिल्ह्यात  अति पाऊस, वादळ व अन्य कारणाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे विम्याचा लाभ मिळेल, अशी आशा असल्याने शेतकरी कृषी विभागाला विचारणा करत होते.

गतवर्षीच्या खरिपातील अन्य जिल्ह्याचा विमा जाहीर होऊनही नगर जिल्ह्यात मात्र विमा कंपनीकडून दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी मराठा महासंघाचे नेते संभाजी दहातोंडे यांनी पाठपुरावा केला होता. ‘ॲग्रोवन’ नेही गतवर्षाच्या खरिपाबाबतच्या रखडलेल्या विम्याची वस्तुस्थिती सातत्याने मांडली. अखेर चार दिवसांपूर्वी नगर जिल्‍ह्यातील गतवर्षीचा खरीप विमा जाहीर झाला. त्यात साडेपाच कोटी रुपये पावसामुळे नुकसान झाल्याचे तर तीन कोटी रुपये उत्पादन घटल्याचे मिळाले आहेत. श्रेयासाठी चढाओढ सुरू आहे.

रक्कम घटल्याबाबत कोण बोलणार?
नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी खरिपात ४ लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी २ लाख ५९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवला होता. त्यातून विमा कंपनीला केवळ शेतकरी हप्ता १७ कोटींचा गेला. विम्यातून साडेसातशे कोटी रुपये संरक्षित झाल्याचे सांगितले. प्रत्यक्षात केवळ साडेआठ कोटींची भरपाई दिली.

शेतकरी संख्या व हेक्टर क्षेत्र समतोल ठेवले असले तरीही भरपाईची टक्केवारी कमी झाल्याचे दिसत आहे. विमा मिळाल्याचे श्रेय घेणारे नेते विमा कंपन्यांच्या नफेखोरीवर आणि शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळाली यावर कधी आवाज उठवणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


इतर बातम्या
पूर्णाथडी म्हशीला राजमान्यतेचा प्रस्ताव...अकोला ः पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट...
देशी गाईंच्या प्रजातींचे संवर्धन गरजेचेपुणे : देशात गाईच्या पारंपरिक जाती नष्ट...
पहिली उचल ३३०० द्यावी ः राजू शेट्टी...कोल्हापूर : यंदा तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३३००...
कृषी पदव्युत्तर प्रवेशासाठी १३...पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर...
अकोला : दोन दिवसांतील अतिवृष्टीने  ४०...अकोला : जिल्ह्यात १६ व १७ ऑक्टोबरला झालेल्या...
यवतमाळ : सोयाबीन-कपाशी झाले मातीमोल यवतमाळ : जिल्ह्याभरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस...
आठ कारखान्यांना  सांगलीतील गाळप परवाना  सांगली : जिल्ह्यात गतवर्षी १५ साखर कारखान्यांना...
कोजागरीनिमित्त  दुधाचे दर वाढले पुणे : कोजागिरी पौर्णिमेसाठी गणेश पेठेतील घाऊक...
जागतिक स्पर्धेत टिकणारे द्राक्ष वाण...पिंपळगाव बसवंत, ता. निफाड : नाशिकचे द्राक्ष...
गावांचा विद्युतपुरवठा  खंडित करणार नाही कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या...
पूरबाधित ऊसप्रश्‍नी  उद्या कोल्हापुरात...कोल्हापूर : पूरबाधित उसाची प्राधान्याने तोड...
निळ्या भातांनी बहरली  आंबेगावमधील...फुलवडे, जि. पुणे : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम...
जळगाव जिल्हा बँकेच्या  निवडणुकीसाठी २७९...जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या सार्वत्रिक...
एकरकमी ‘एफआरपी’साठी आता आंदोलन सातारा : कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील काही...
वरणगाव परिसरात पिकांवर पावसाचे पाणीवरणगाव, जि. जळगाव : यंदाच्या पावसाने...
अनुदानित हरभरा बियाणे उपयोगात आणावे :...नाशिक : ‘‘राज्यात २४ ऑक्टोबरपर्यंत हरभरा प्रमाणित...
नांदेड जिल्हा बॅंकेची मदार २३०...नांदेड : नांदेड जिल्हा बॅंकेत कर्मचाऱ्यांची वानवा...
किसान रेल्वेला सोलापुरातून प्रतिसादसोलापूर ः मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून किसान...
खानदेशात रब्बीसाठी पीककर्जाचे वितरण सुरूजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची तयारी सुरू आहे....
धर्माबादेत डीएपीची खताची कृत्रीम टंचाईनांदेड : धर्माबाद येथील कृषी सेवा केंद्र चालक...