शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना स्टाइलने वठणीवर आणू : उध्दव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे

नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला असल्याची शक्यता मी यापूर्वीही पंढरपूरमध्ये व्यक्त केली होती. त्या वेळी लोकांना वाटले मी सरकारविरुद्ध बोलतोय. मी सरकारविरुद्ध बोलत नव्हतो तर वस्तुस्थिती मांडली होती. सरकार आपले आहे म्हटल्यावर योजना लोकांपर्यंत पोचतात का, हे पाहणे शिवसेनेचे काम आहे. शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना आपल्या स्टाइलने आणि सरकार हे कायद्याने वठणीवर आणेल, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

राज्यात शेतकऱ्यांसाठी पीकविमा मदतकेंद्रे उभारणार असून, आज (रविवारी) श्रीरामपूर येथे या केंद्राचा श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सुनील शिंदे, मिलिंद नार्वेकर, नरेंद्र दराडे, भाऊ कोरगावकर, अनिल राठोड, संजय घाडी या वेळी उपस्थित होते. 

या वेळी श्री. ठाकरे म्हणाले, की आज राजकारणात फक्त निवडणुकीपुरते लोक येतात, आश्वासने देतात व नंतर गायब होतात. आम्ही मात्र केवळ निवडणुकीपुरते नव्हे, कायम लोकांसोबत असतो. देशात हिंदुत्व बदनाम होत आहे. अयोध्येत राम मंदिर होणारच. शेतकऱ्यांना कर्जमाफी, विमा योजनेचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांना कोणी वाली नाही की का? तीन वर्षांपूर्वी संपाच्या वेळी पुणतांब्याचे शेतकरी माझ्याकडे आले होते. त्या वेळी मी त्यांना पाठिंबा दिला होता. शिवसेना सोबत होती. शिवसेना हा एकमेव पक्ष त्या वेळी शेतकऱ्यांसोबत होता. पीकविमा योजनेबाबत मध्यस्थांनी हप्ते गोळा केले. आता कंपनीने भरपाई द्यावी. शेतकऱ्यांचा पैसा त्यांना लुटता येणार नाही. शिवसेना शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू करणार आहे. शेतकऱ्यांसाठी समाधान कारक कामे करता येत नसतील, तर सत्ताधारी अपयशी आहेत असे मी समजतो. बॅंका पीककर्ज का वाटप करत नाहीत, हे पाहून कायद्यानुसार बॅंकांना वठणीवर आणू, असे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

‘आता लोकांच्या घरी जा’  उद्धव ठाकरे म्हणाले, की लोकांच्या आशीर्वादाने दोनदा खासदार झालात, आता त्यांचे आशीर्वाद घ्या, घरोघरी जा, भेटा. राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याची मला पर्वा नाही. मला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. आमचं ठरलं आहे. त्यामुळे विरोधकांना काय बोलायचे ते बोलू द्या. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com