पीकविम्यात मोठा घोटाळा : उद्धव ठाकरे

पीकविम्यात मोठा घोटाळा : उद्धव ठाकरे
पीकविम्यात मोठा घोटाळा : उद्धव ठाकरे

बीड : पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. एक दुष्काळ मी हटवतो दुसरा (राजकीय) दुष्काळ तुम्ही हटवा. दुष्काळ गंभीर असला तरी शिवसेना शेतकऱ्यांसोबत खंबीर आहे, असे आश्‍वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.  श्री. ठाकरे यांनी बुधवारी (ता. ९) जिल्हा दौरा केला. दुष्काळग्रस्त पशुपालक शेतकऱ्यांना पशुखाद्य वाटप आणि पाण्यासाठी टाक्यांचे वाटप श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. तालुक्यातील म्हाळसजवळा व गेवराई येथे मदत वाटप कार्यक्रम झाले. तर बीडमध्ये त्यांची सभा झाली. या वेळी ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.  श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक नुसतेच दौऱ्यावर येऊन गेले, त्याचा काही फायदा झाला नाही. भाजपकडून घोषणांच्या नावावर नुसते बळिराजाला गाजर देण्यात येत आहे. भाजप फक्त घोषणांचे जुमले बांधत आहे.’’ बीडमध्ये केंद्रीय पथक आल्यानंतर तुमच्या रेशनमध्ये कपात झाली. जर निर्णय न्यायालय देणार असेल, तर मग तुम्ही जाहिरनाम्यात राम मंदिराचे वचन का दिलेत, असा सवालही त्यांनी केला.  पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत, मी ‘मन की बात’ नाही, ‘जन की बात’ करतो. खरं बोलून एकही मत मिळालं नाही तरी चालेल, पण खोटं बोलून मिळालेली मते नकोत, असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आगामी निवडणुकीतील युतीच्या चर्चेबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, की युतीची चर्चा गेली खड्ड्यात पहिले माझ्या शेतकऱ्याचे काय करता ते बोला.  सरकारी यंत्रणेचा सुस्त पडलेला अजगराला ढोसण्यासाठी मी फिरतोय. कोरडी भाषणं आणि कोरड्या घोषणांनी हंडे भरत नाहीत. आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे. याप्रसंगी पर्यावरणमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, शिवसेना राज्यसंघटक गोविंद घोळवे, खासदार रवींद्र गायवाड, माजी मंत्री बदामराव पंडित, जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खामदे माजी आमदार सुनील धांडे, शिवसेने जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे आदींसह नेते व शिवसेना कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com