Agriculture news in marathi, Crop insurance in Parbhani district Compensation should be paid immediately | Agrowon

परभणी जिल्ह्यातील पीकविमा भरपाई तत्काळ जमा करावी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जानेवारी 2022

परभणी ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम २०१९-२० आणि २०२०-२१ मधील पीकविमा परतावा प्रलंबित आहे. संबंधित शेतकऱ्यांना विमा भरपाई अदा करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या (लाल बावटा) परभणी जिल्हा कमिटीतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.

परभणी ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम २०१९-२० आणि २०२०-२१ मधील पीकविमा परतावा प्रलंबित आहे. संबंधित शेतकऱ्यांना विमा भरपाई अदा करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या (लाल बावटा) परभणी जिल्हा कमिटीतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (अतिवृष्टी अनुदान) वाटप केले आहे. पीकविमा कंपन्यांना शेतकऱ्यांना पीकविमा वाटप करण्याचे आदेश प्रशासकीय व शासकीय पातळीवर आले आहेत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आंदोलन केले. त्यामुळे तेथे कंपन्यांनी नमते घेतले. शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा रक्कम जमा केली आहे. 

परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्ह्यातील रेणुका शुगर्स, पाथरी, लक्ष्मी नृसिंह शुगर्स, आमडापूर, ट्‍वेंटीवन शुगर, सायखेडा या साखर कारखान्यांना थकीत एफआरपीबाबत वारंवार आदेश देऊनही थकीत एफआरपीचे वाटप शेतकऱ्यांना  केले जात नाही. पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना वंचित ठेवले आहे. 

थकीत पीकविमा भरपाई व एफआरपी येत्या गुरुवारपर्यंत (ता. २०) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न केल्यास अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किसान सभेच्या परभणी जिल्हा कमिटीचे सेक्रेटरी कॉ. दीपक लिपणे यांनी दिला. 
 


इतर बातम्या
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...