agriculture news in marathi crop insurance process tobe attached to Remote sensing says AGM | Agrowon

विमाभरपाई प्रक्रिया रिमोट सेन्सिंगशी जोडण्याचा प्रयत्न : केंद्रीय कृषिमंत्री

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 जानेवारी 2020

पुणे : पीककापणी प्रयोगाच्या आधारावर पंतप्रधान पीकविमा योजना न राबविता तंत्रज्ञानावर आधारित माहितीवर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची चाचपणी केंद्र सरकार करीत आहे. त्यासाठी सध्या चार जिल्ह्यांमध्ये पथदर्शक प्रयोग सुरू असून, निष्कर्ष चांगले आल्यास देशभर रिमोट सेन्सिंगवर आधारित पीकविमा भरपाई देण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. 

पुणे : पीककापणी प्रयोगाच्या आधारावर पंतप्रधान पीकविमा योजना न राबविता तंत्रज्ञानावर आधारित माहितीवर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची चाचपणी केंद्र सरकार करीत आहे. त्यासाठी सध्या चार जिल्ह्यांमध्ये पथदर्शक प्रयोग सुरू असून, निष्कर्ष चांगले आल्यास देशभर रिमोट सेन्सिंगवर आधारित पीकविमा भरपाई देण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. 

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांची कृषिभूषण ॲड. प्रकाश पाटील (धुळे) व विजय म्हस्के (जालना) यांनी दिल्लीत भेट घेतली असता चर्चेत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी कृषिमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. सध्या रासायनिक खतांना अनुदान दिले जाते. मात्र, विद्राव्य खतांना अनुदान नाही. रासायनिक खतांची पिकांना उपलब्धता १० ते ४० टक्के आहे. उर्वरित खत हवेत जाते व जमिनीत पडून राहते. यामुळे शेतकरी व शासनाचेही आर्थिक नुकसान होते. या उलट विद्राव्य खते वापरल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात १० ते २० टक्के वाढ होईल, अशी मागणी करण्यात आली.

शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांना बियाणे वितरण अनुदान द्यावे, अशी मागणी श्री. चौधरी यांच्याकडे केली. त्यामुळे या विषयाबाबत कृषी राज्यमंत्र्यांनी या शेतकऱ्यांची भेट केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याशी घडवून आणली. या वेळी अॅड. पाटील यांनी जीवनधारा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, तर विजय म्हस्के यांनी पूर्णा केडणा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने मुद्दे मांडले. केंद्र सरकारच्या धोरणानुसार व निती आयोगाच्या सूचनेप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांना शासकीय योजनांमध्ये प्राधान्य द्यावे, महाराष्ट्रात यापूर्वी दिले जात असलेले बियाणे उत्पादक अनुदान व प्रमाणित बियाणे वितरण अनुदान पुन्हा द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

शासकीय निधी शेतकऱ्यांना नवीन संशोधित बियाणे लवकर मिळून त्याचे उत्पादन वाढावे हा उद्देश आहे. बियाणे अनुदान योजनेचा असताना, अनुदानाचा फायदा शेतकऱ्यांना न होता महाराष्ट्रात महाबीजला, शासकीय कंपन्यांना होतो आहे. राज्य सरकार केंद्र सरकारच्या निधीचा गैरवापर करीत आहे. हेच बियाणे वितरण अनुदान व्यवस्थित वापरल्यास निकोप स्पर्धा निर्माण होईल, असे केंद्रीय मंत्र्यांना सांगण्यात आले.

राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांसंदर्भात अतिशय चुकीचा निर्णय घेतला आहे. बियाणे उत्पादकांना मूलभूत बियाणे देताना त्याच्या किमती व्यतिरिक्त एका जातीकरिता २५००० रुपये शुल्क व पायाभूत व प्रमाणित बियाणे विक्रीच्या तीन टक्के स्वामित्व शुल्क लावले आहे. यामुळे शेतकऱ्यांना बियाणे महाग मिळेल, असेही या वेळी चर्चेत सांगण्यात आले. याबाबत बियाणे विभागाच्या सहसचिवांनी लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात आला.

आजच्या बैठकीला शेतकरी नेते निमंत्रित
दरम्यान, केंद्रीय संसदीय स्थायी समितीने शेतकरी प्रतिनिधी म्हणून पीक योजनेवर चर्चा करण्यासाठी ॲड. पाटील यांना निमंत्रित केले आहे. २३ जानेवारीला नागपूरला ही बैठक होईल. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, विजय जावंधिया, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल धनवट अध्यक्ष, प्रकाश पोहरे, किशोर तिवारी, मदन देशपांडे, अजित नवले यांनाही चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे.  


इतर अॅग्रो विशेष
‘पीएम-किसान’चा १२ कोटी शेतकऱ्यांना...नवी दिल्ली: शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी...
पंजाबमध्ये भूमिहीन शेतमजुरांना कर्जमाफीचंदीगड, पंजाब: राज्याचा २०२०-२१ चा १.५४ लाख...
देशात ११० लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाजनवी दिल्ली: देशात यंदा हरभरा उत्पादनात वाढ...
‘पोकरा’तील सामुदायिक शेततळे, शेळीपालन...अकोला ः राज्यात राबविल्या जात असलेल्या नानाजी...
वन्यप्राण्यांचा वाढता तापअकोला जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील एका...
पीकविम्यातील बदलांचा लाभ कुणाला?‘ऐच्छिक’ घात  देशभरात एकूण शेतकऱ्यांपैकी ५८...
एक लाख टन मका म्यानमारमधून आयातनवी दिल्ली: देशात यंदा कमी उत्पादन झाल्याने...
राज्यातील बावीस कारखान्यांचा गाळप हंगाम...कोल्हापूर  : राज्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
दूध संकलनासह पदार्थनिर्मितीतून प्रगतीपुणे जिल्ह्यातील वढू (ता. शिरूर) येथील सुनील आणि...
एकलव्य शेतकरी बचत गटाचे उपक्रमगोळप (ता. जि. रत्नागिरी) गावातील एकलव्य शेतकरी...
विदर्भात आज गारपिटीचा इशारापुणे : पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा...
संघर्ष येथील संपणार कधी? शेती कसत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, करावा...
`ज्ञानेश्‍वरी'त दडलंय कृषी विज्ञान कां सु क्षेत्री बीज घातले।  ते आपुलिया परी...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
‘जानुबाई’, ‘केशवराज’ संस्था ठरल्या...पुणे: पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून प्रभावी...
साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रात ‘नंबर १’मुंबई ः सर्वोत्तम न्यूज चॅनेल्सच्या स्पर्धेत ‘...
कृषी परिषदेने विद्यापीठांसाठी नेमले...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे: पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भ,...
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...