agriculture news in marathi, crop insurance proposals from farmers, nanded, maharashtra | Agrowon

नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८ हजारांवर पीकविमा प्रस्ताव
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जुलै 2019

नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता. १३) पर्यंत शेतकऱ्यांनी २८ हजार ३१३ विमा प्रस्ताव सादर केले. या शेतकऱ्यांनी १ कोटी १३ लाख १ हजार ७४४ रुपये विमा हप्ता भरून १३ हजार १०४.८६ हेक्टरवरील खरीप पिकांसाठी ५० कोटी २ लाख ५८ हजार ६०९ रुपयांचे विमा संरक्षण घेतले. पीकविमा योजनेतील सहभागासाठी शेतकऱ्यांनी येत्या बुधवार (ता. २४) पर्यंत अधिसूचित मंडळातील पिकांचे विमा प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले. 

नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत २०१९-२० च्या खरीप हंगामात शनिवार (ता. १३) पर्यंत शेतकऱ्यांनी २८ हजार ३१३ विमा प्रस्ताव सादर केले. या शेतकऱ्यांनी १ कोटी १३ लाख १ हजार ७४४ रुपये विमा हप्ता भरून १३ हजार १०४.८६ हेक्टरवरील खरीप पिकांसाठी ५० कोटी २ लाख ५८ हजार ६०९ रुपयांचे विमा संरक्षण घेतले. पीकविमा योजनेतील सहभागासाठी शेतकऱ्यांनी येत्या बुधवार (ता. २४) पर्यंत अधिसूचित मंडळातील पिकांचे विमा प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शनिवारपर्यंत जनसुविधा केंद्र (सीएससी) वर २७ हजार ७५२ विमा प्रस्ताव सादर केले आहेत. एकूण १ कोटी ९ लाख २५६ रुपये विमा हप्ता भरुन १२ हजार ७५४  हेक्टरवरील पिकांसाठी संरक्षण घेतले आहे. बॅंकांमध्ये ३८२ विमा प्रस्ताव सादर केले. ३ लाख १२ हजार ३४९ रुपये एवढा विमा हप्ता भरून २४५ हेक्टवरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले. राष्ट्रीय पीकविमा पोर्टलवर शेतकऱ्यांनी स्वतःहून १७९ विमा प्रस्ताव सादर केले. एकूण ८९ हजार १३८ रुपये विमा हप्ता भरून १०४. ३५ हेक्टरवरील पिकांसाठी संरक्षण घेतले.

गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी विमा प्रस्ताव सादर करावे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व पिकांचा जोखीमस्तर ७० टक्के आहे. सोयाबीन, मूग, उडिद, ज्वारी या पिकांसाठी सर्व ८० मंडळे, तर कपाशीसाठी ७८ मंडळे अधिसूचित करण्यात आली आहेत. भात आणि तीळ पिकांसाठी १६ तालुके अधिसूचित करण्यात आले. अधिसूचित मंडळे तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण घेता येईल, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पीक विमा संरक्षित रक्कम (हेक्टरी विमा हप्ता (रुपये)
कपाशी ४३०००  २१५०
सोयाबीन ४३०००  ८६०
मूग १९०००  ३८०
उडीद  १९००० ३८०
तूर  ३१५००  ६३०
तीळ २३१०० ४६२
ज्वारी  २४५०० ४९०
भात ४३५००  ८७०

 

इतर बातम्या
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...