पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात जमा करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको करीत बॅंक प्रशासनाविरोधात रोष व्यक्‍त केला. सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या प्रशानाकडून लेखी आश्‍वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. करजगाव (ता. परतवाडा) येथे सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाची शाखा आहे. संबंधित बॅंकेच्या शाखा अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना मंजूर झालेली पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात वळती केली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. सुरुवातीला पीकविमा कंपन्यांकडून भरपाईसाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला होता. विमा कंपन्यांनी कशीबशी भरपाई दिली असतानाच बॅंकेच्या शेतकरीविरोधी धोरणाचा फटका त्यांना बसला. बॅंकेने कर्ज खात्यात वळती केलेली पीकविम्याची रक्‍कम मिळावी, याकरिता शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला. निवेदन, तक्रारीसुद्धा वरिष्ठपातळीवर केल्या. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अखेरचा पर्याय म्हणून रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले. पीकविम्याची रक्‍कम आमच्या बॅंक खात्यातील बचत खात्यात करायला हवी होती, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. खरपी, गोविंदपूर, करजगाव, सर्फापूर, कुऱ्हा, सायखेड, बोदळ, कल्लोळी, अलमपूर अशा जवळपास १६ गावांतील ४०० शेतकरी बॅंकेच्या धोरणामुळे पीकविमा भरपाईपासून वंचित राहिले आहेत, असा आरोप आंदोलनाच्या वेळी करण्यात आला. आंदोलनात शिवसेनेचे योगेश पवार यांच्यासह शेतकरी दिनेश अंबडकर, सुधीर फरकाळे, गणेश बिजवे, मनोज गाडबैल, नीलेश पवार, स्वप्नील सावरकर, शिवम वऱ्हाडे, नितीन वडनेरकर, नितीन रहाटे, चेतन लसणकर, राम बनसोड, अक्षय अकोलकर सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com