नगरमधील दहा हजारांवर शेतकऱ्यांना फळपीक विमा परतावा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर   ः पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान फळ पीकविमा योजनेतून २०१७-१८ च्या हंगामातील मृगबहार संत्रा, मोसंबी, पेरू, चिकू व डाळिंब या पाच पिकांसाठी जिल्ह्यामधील १० हजार ८८२ शेतकऱ्यांना ७६८१ हेक्‍टरसाठी सुमारे ३८ कोटी ३२ लाख ३४ हजार ४३८ रुपयांचा विमा परतावा मिळाला आहे.

फळपिकाचे हवामान, पाऊस व अन्य कारणाने नुकसान झाले तर त्याची शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली जाते. मात्र सरकारला मोठ्या प्रमाणातील रकमेची मदत देणे शक्‍य नाही. त्यामुळे शासनाने पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान फळ पीकविमा योजना सुरू केली. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.

२०१७-१८ च्या हंगामातील मृगबहारात वेगवेगळ्या कारणाने जिल्ह्यामध्ये संत्रा, मोसंबी, पेरू, चिकू डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचा आर्थिक फटका उत्पादकांना बसला होता. त्यामुळे विमा योजनेतून मदत देण्याची तातडीने मागणी केली जात होती. विमा कंपनीने संत्रा, मोसंबी, पेरू, चिकू, डाळिंब उत्पादकांना या पाच पिकांसाठी ३८ कोटी ३२ लाख ३४ हजार ४३८ रुपयाचा विमा रक्कम दिली आहे. जिल्ह्यामधील १० हजार ८८२ शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. विमा रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. मिळालेल्या मदतीत डाळिंब उत्पादकांची संख्या मोठी आहे.

पीकनिहाय रक्कम (कंसात शेतकरी)

  • डाळिंब ः ३६ कोटी ७६ लाख ९६ हजार (१०,५०१) 
  • पेरू ः ७१ लाख ७५ हजार सातशे (१६५)
  • मोसंबी ः १२ लाख ३७ हजार ८८ (२१)
  • चिकू ः ८ लाख ४८ हजार ७५० (३३)
  • संत्रा ः ६२ लाख ७६ हजार ९०० (१६२)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com