Agriculture news in marathi In crop insurance scheme Farmers' participation declined | Agrowon

नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग घटला

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 एप्रिल 2021

नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने शेतपीकांचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळावी यासाठी राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेत यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकरी सहभाग घटला आहे.

नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने शेतपीकांचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळावी यासाठी राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेत यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकरी सहभाग घटला आहे. खरीप व रब्बी हंगामात मिळून गेल्यावर्षी ७ लाख ३२ हजार ४८ शेतकऱ्यांनी ४ लाख ६१ हजार नऊशे ८७ हेक्टरवर विमा उतरवला होता. त्या तुलनेत यंदा शेतकरी संख्या दीड लाखाने घटली असून, १ लाख ३७ हजार १४ हेक्टरने क्षेत्रही घटले आहे.

विशेष म्हणजे वेगवेगळ्या कारणाने यंदा शेतीपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पीक विम्याची जनजागृती करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी होण्याविषयीची कृषी विभागावर जबाबदारी आहे. येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने मागील वर्षभरात पीकविम्याबाबत गांभीर्याने घेतले नाही. त्याचा परिणाम शेतकरी सहभागावर झाल्याचे दिसत आहे.  

 अवेळी तसेच अतिपाऊस, गारपीट, यासह नैसर्गिक संकटाने शेतीपिकांचे नुकसान झाले तर शासनाला मदत द्यावी लागते. अनेक वेळा होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात असल्याने मदत देण्याला अडचणी येतात. त्यामुळे शासनाने खरीप, रब्बी पिके, फळबागांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू केली. गेल्या काही वर्षांपासून नगर जिल्ह्यात विम्यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी कृषी विभाग व लोकप्रतिनिधींकडून जनजागृती केल्याने शेतकऱ्यांचा सहभाग मोठा असे.

गेल्यावर्षभरात मात्र पिकविम्याबाबत येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयालाच गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे. पीकविम्याबाबत जनजागृतीही झाली नाही आणि शेतकरी संवादही झाला नाही. त्याचा परिणाम थेट सहभागावर असल्याचे आता दिसून आले आहे. नगरमध्ये कृषी विभागाच्या कामाबाबत शेतकऱ्यांत नाराजी आहे. योजनाही प्रभावीपणे राबवल्या जात नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

पीकविम्याची स्थिती (कंसात गतवर्षीची स्थिती)     

  • खरीप शेतकरी सहभाग    ४ लाख ६६ हजार २४५ (५ लाख ९६ हजार १३०) 
  • हेक्टर क्षेत्र    २ लाख ४९ हजार ४८४ (३ लाख ८९ हजार ७७४) 
  • विमा संरक्षित रक्कम    ७४४ कोटी ९९ लाख (९८७ कोटी ९५ लाख) 
  • शेतकऱ्यांनी भरलेला हप्ता    १७ कोटी ६५ (२५ कोटी २७ लाख)
  • रब्बी शेतकरी सहभाग    १ लाख १९ हजार ५२१ (१ लाख ३५ हजार ९१८) 
  • हेक्टर क्षेत्र    ६५ हजार ४८८ (७२ हजार ९१३) 
  • विमा संरक्षित रक्कम    २३१ कोटी ४२ लाख (२०६ कोटी ९ लाख) 
  • शेतकऱ्यांनी भरलेला हप्ता    ५ कोटी ९ लाख (४ कोटी)

इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...