नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १ लाख हेक्टरवरील पीकविमा

नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १ लाख हेक्टरवरील पीकविमा
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १ लाख हेक्टरवरील पीकविमा

नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोमवारपर्यंत (ता. १५) २ लाख २३ हजार ९२६ विमा प्रस्ताव सादर केले. शेतकऱ्यांनी १ लाख २ हजार ८९९ हेक्टरवरील खरीप पिकांसाठी ३९० कोटी ३३ लाख ५३ हजार ८९२ रुपयांचे विमा संरक्षण घेतले. त्यासाठी ८ कोटी ६७ लाख ७६ हजार ६२ रुपये विमाहप्ता भरण्यात आला.

ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. याअंतर्गत बॅंका, जनसुविधा केंद्र, राष्ट्रीय विमा पोर्टलवर वैयक्तिकरीत्या आॅनलाइन पीकविमा प्रस्ताव सादर करण्याची सुविधा आहे. सोमवारपर्यंत (ता. १५) शेतकऱ्यांनी जनसुविधा केंद्रात (सीएससी) २ लाख २१ हजार ९७८ विमा प्रस्ताव सादर केले. त्याद्वारे १ लाख १ हजार ५४९ हेक्टरवरील पिकांसाठी ३८४ कोटी ८७ लाख ८५ हजार ३४ रुपयांचे विमा संरक्षण घेतले. त्यासाठी ८ कोटी ५३ लाख ९ हजार ४९२ रुपयांचा हप्ता भरला. 

तालुकानिहाय पीकविमा स्थिती 

तालुका  विमा प्रस्ताव  विमा हप्ता
नांदेड  ५१४० २७१७१५६
अर्धापूर ४८९९ ३१४६१३४
मुदखेड ३४५३ २१३८१७१
हदगाव १५२४८  १०४४९७३६
हिमायतनगर १९६२ ७५६७३१
माहूर १३६४ ७७३३८०
किनवट १४३२  ६२९१८४
भोकर  १७२७९ ५६५३७४७
उमरी २१५९८ ७९२५७६७
धर्माबाद ४३४९ २४९५६९८
नायगाव १२९६२ ५९४०२५६
बिलोली ४८८१ २६१६३६६
देगलूर १४०६३ ६७४०५७२
मुखेड ४९१०६ १५०१६०६०
कंधार  २५८७१ ७३२३६६३
लोहा ३९७८९ १२४५३३३४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com