पुणे जिल्ह्यात खरिपासाठी पीककर्ज वाटप सुरू

पुणे ः ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामात घेतलेल्या पीक कर्जाची ३१ मार्चपर्यंत परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून चालू वर्षी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी ‘कोरोना’चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पीककर्ज घेण्यासाठी बॅंकेच्या शाखेमध्ये गर्दी करू नये. तसेच कर्ज घेताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.
crop loan allocation for kharif season begins
crop loan allocation for kharif season begins

पुणे ः ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामात घेतलेल्या पीक कर्जाची ३१ मार्चपर्यंत परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून चालू वर्षी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी ‘कोरोना’चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पीककर्ज घेण्यासाठी बॅंकेच्या शाखेमध्ये गर्दी करू नये. तसेच कर्ज घेताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.

सध्या ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात वाढत असताना नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड केली आहे, असे शेतकरी पुन्हा खरिपात कर्ज घेण्यासाठी तयारी करतात. यंदा ‘कोरोना’चे संकट लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन संबंधित शाखांमध्ये पीक कर्जाची प्रक्रिया करून कर्ज घ्यावे.  

यंदा खरीप आणि रब्बी हंगामात पुणे जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या २६६ हून अधिक शाखांमार्फत गाव पातळीवरील सुमारे १२८२ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना दिला. बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्जाचे वाटप केले आहे. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप केले. गेल्या वर्षी खरिपात एक लाख ४८ हजार ३६६ शेतकऱ्यांना एक हजार १२८ कोटी ४२ लाख ४ हजार, तर रब्बीत ४३ हजार ३१७ शेतकऱ्यांना २४० कोटी ३३ लाख ६९ हजार रुपयांचे वाटप केले होते. 

राज्यात दोन्ही बाबीची विना विलंब अंमलबजावणी करणारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सर्वप्रथम केली आहे. रिझर्व बॅंक, शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली आहे. त्यांना एक एप्रिलपासून नवीन कर्ज वितरण करण्यासाठी मंजुरीचे अधिकार तालुका पातळीवर दिलेले आहे. त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी दिले आहेत.

तीन टक्के व्याज सवलतीसाठी ३१ मे पर्यत मुदत शेतकऱ्यांनी बॅंकेकडून एक एप्रिल ते ३१ मार्च दरम्यान देय असलेले सर्व अल्पमुदतीचे पीककर्जाची परतफेड मुदत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेनेही अल्पमुदत पीक कर्जाची अंमलबजावणी केली. शेतकरी सभासदांना तीन लाख रूपयांपर्यत २०१९-२० च्या खरीप हंगामासाठी केंद्र शासनाच्या तीन टक्के व्याज सवलतीसाठी ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना बॅंकेकडील गावनिहाय असलेल्या शाखांमधून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अनेक ठिकाणी पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. - प्रतापसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com