हिंगोलीत १० हजार ८६६ शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप

हिंगोली : जिल्ह्यात शुक्रवार (ता.२२) पर्यंत १० हजार ८६६ शेतकऱ्यांना ४१ कोटी ४४ लाख ८९ लाख रुपये (३.५५ टक्के) पीक कर्जवाटप करण्यात आले.
Crop loan disbursement to 10 thousand 866 farmers in Hingoli
Crop loan disbursement to 10 thousand 866 farmers in Hingoli

हिंगोली : जिल्ह्यात शुक्रवार (ता.२२) पर्यंत १० हजार ८६६ शेतकऱ्यांना ४१ कोटी ४४ लाख ८९ लाख रुपये (३.५५ टक्के) पीक कर्जवाटप करण्यात आले. 

जिल्ह्यातील बॅंकांना यंदाच्या खरिपात एकूण १ हजार १६८ कोटी ९५ लाख रुपये एवढे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यात जिल्हा बॅंकेला १४८ कोटी ८९ लाख रुपये, व्यापारी बॅंकांना ८५९ कोटी १० लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला १६० कोटी ९६ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे.

आजवर जिल्हा बॅंकेने सर्वाधिक १० हजार ३१ शेतकऱ्यांना २८ कोटी ३१ हजारांचे पीक कर्जवाटप केले. व्यापारी बॅंकांना सर्वाधिक पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. परंतु, या बॅंकांनी आजवर ७५९ शेतकऱ्यांना १२ कोटी ८९ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बॅंक सद्यस्थितीत कर्जवाटपात पिछाडीवर आहे. आजवर ७६ शेतकऱ्यांना ६४ लाख २८ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप केले.  खरीप पीक कर्जवाटप (कोटींत) 

बॅंक उद्दिष्ट वाटप शेतकरी संख्या टक्केवारी 
जिल्हा बॅंक १४८.८९ २८.०० १००३१ १८.८१ 
व्यापारी बॅंका ८५९.१० १२.८० ७५९ १.४९
म.ग्रा.बॅंक १६०.९६ ०.६४२८ ७६ ०.४० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com