सोलापूर जिल्ह्यात पीक कर्जवाटप ८० टक्क्यांवर

सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला पीक कर्जवाटपासाठी देण्यात आलेल्या एकूण उद्दिष्ठापैकी ऑगस्टअखेर ११५१.७६ कोटी (८० टक्के) रुपयांचे वाटप झाले आहे.
Crop loan disbursement at 80 percent in Solapur district
Crop loan disbursement at 80 percent in Solapur district

सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला पीक कर्जवाटपासाठी देण्यात आलेल्या एकूण उद्दिष्ठापैकी ऑगस्टअखेर ११५१.७६ कोटी (८० टक्के) रुपयांचे वाटप झाले आहे. पहिल्या दीड महिन्यात रखडलेले कर्जवाटप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात काहिसे वेगाने झाले.  

यंदा जिल्ह्यात वेळेवर पाऊस झाल्याने खरीप पीकांची स्थिती चांगली राहिली. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्यांकडून यंदा कर्जाची मागणी वाढली होती. पण, अनेक बँका विशेषतः राष्ट्रीयकृत बँकांनी मात्र सोईस्कर भूमिका घेतल्याने सुरुवातीला कर्जवाटप काहिसे रखडले होते. पहिल्या दीड महिन्यात ३० टक्क्यांच्या पुढेही कर्जवाटप पोचले नव्हते. पण, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बँकांना फौजदारी कारवाईचा इशारा देताच बँका हलल्या आणि आज बँकांनी वेगाने कर्जवाटप सुरु केले. 

जिल्हा अग्रणी बँकेनेही पीक कर्ज वाटपाबाबत विशेष मोहीम हाती घेतली. त्यानुसार ३१ ऑगस्टअखेर ११५१.७६ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप होऊ शकले. ही रक्कम उद्दिष्टाच्या ८० टक्के आहे. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला १४३८.५२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. 

राष्ट्रीयकृत बँकांची उदासिनता

जिल्ह्यातील खासगी बँकानी त्यांच्या उद्दिष्टाच्या १६३ टक्के, तर विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेने सुमारे १४६ टक्के  कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी आतापर्यंत ६० टक्के कर्जवाटप करुन आपली उदासिनता कायम ठेवल्याचे दिसून येते. 

जिल्ह्यात यंदा खरीपाखालील पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे पीक कर्जाच्या मागणीत वाढ होणे अपेक्षित होते. त्यानुसार पीक कर्जवाटप केले जावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. त्यानुसार वाटप वेळेत आणि सर्वाधिक कसे होईल, यावर लक्ष दिले.  - प्रशांत नाशिककर, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, सोलापूर

बॅंकेचे नाव कर्जवाटप उद्दिष्ट (रू. लाखांत) प्रत्यक्षात वाटप   टक्केवारी
राष्ट्रीयीकृत बॅंका १०५९६९.०० ६३५९९.०१ ६०.०२
खाजगी बॅंका  १८२८६.०० २९८५२.७८ १६३.२५
जिल्हा मध्यवर्ती बॅंक १५४५७.००  १५६४३.७७ १०१.२१ 
विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक ४१४०.०० ६०८१.२९  १४६.८९ 
एकूण १४३८५२.०० ११५१७६.८५ ८०.०७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com