नगर जिल्ह्यात यंदा सव्वापाच लाख शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप

नगर ः जिल्ह्यात यंदा खरीप व रब्बी हंगामात मिळून सुमारे ५ लाख २३ हजार ७१४ शेतकऱ्यांना ४ हजार ५०३ कोटी ९० लाखांचे पीक कर्जवाटप केले आहे. एकूण उद्दिष्टापैकी खरिपात एकूण १०२ टक्के, तर रब्बीत ३४ टक्के वाटप झाले आहे.
Crop loan disbursement to all lakh farmers in Nagar district this year
Crop loan disbursement to all lakh farmers in Nagar district this year

नगर ः जिल्ह्यात यंदा खरीप व रब्बी हंगामात मिळून सुमारे ५ लाख २३ हजार ७१४ शेतकऱ्यांना ४ हजार ५०३ कोटी ९० लाखांचे पीक कर्जवाटप केले आहे. एकूण उद्दिष्टापैकी खरिपात एकूण १०२ टक्के, तर रब्बीत ३४ टक्के वाटप झाले आहे, अशी माहिती अग्रणी बॅंकेतून देण्यात आली. यंदाही बॅंकेकडून कर्जवाटपात खासगी बॅंकांचा हात आखडताच असल्याचे दिसून येत आहे.   

जिल्ह्यात यंदा खरिपात ४ लाख १५ हजार ४७८ शेतकऱ्यांना ३ हजार ७५३ कोटी ९१ रुपये, तर रब्बीत २ लाख २६ हजार २९४ शेतकऱ्यांना २ हजार २१ कोटी ६९ लाख रुपये असे दोन्ही हंगामात मिळून ६ लाख ४१ हजार ७७२ शेतकऱ्यांना ५ हजार ७७६ कोटी ६९ लाख रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. त्यातून ५ लाख २३ हजार ७१४ शेतकऱ्यांना ४ हजार ५०३ कोटी ९० लाखाचे कर्जवाटप केले आहे. त्यात खरिपात सरासरी १०२ टक्के वाटप झाले. ४ लाख ८० हजार ३४० शेतकऱ्यांना ३ हजार ८२१ कोटी २० रुपये वाटप केले आहेत. खरिपात राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ६९ टक्के, खासही बॅंकानी ६५ टक्के, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेकडून ५७ टक्के, जिल्हा बॅंकेकडून १६७ टक्के वाटप झाले आहे. 

‘‘रब्बीत आतापर्यंत राष्‍ट्रीयीकृत बॅंकेकडून १८ हजार २१२ शेतकऱ्यांनी ३३९ कोटी, खासगी बॅंकाकडून ३ हजार १०२ शेतकऱ्यांना ९२ कोटी ५२ लाख, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेकडून २१९ शेतकऱ्यांना २ कोटी ८१ लाख आणि जिल्हा बॅंकेडून २१ हजार ८४१ शेतकऱ्यांना २४८ कोटी ३७ लाखाचे पीक कर्जवाटप केले’’, असे अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक पी. एम. शेंडे  म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com