कृषिमंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यातच पीक कर्जवाटप वाढेना

प्रतिक्रिया: आजपर्यंत कर्ज परतफेड केली आहे, मात्र आता कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करत आहेत. जाचक अटी घालून तांत्रिक कारणे पुढे केली जात आहेत. वरून शासन म्हणते पीककर्ज द्या, मात्र, बँका त्यांचे आदेश डावलून पीककर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. - पंडित वाघ, शेतकरी, बार्डे, ता.कळवण अग्रणी बँकेचे व्यवस्थापक व मी लक्ष घालून आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कर्जाचे वितरण, कसे वाढेल, याकडे लक्ष आहे. त्यानुसार बँकांकडून आढावा घेऊन नियमित सूचना केल्या जात आहेत. गेल्या दोन महिन्यात अडचणी आल्या. आता कामकाज गती घेईल. - गौतम बलसाणे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), नाशिक.
Crop loan disbursement did not increase in Nashik district of Agriculture Minister
Crop loan disbursement did not increase in Nashik district of Agriculture Minister

नाशिक : मूग नक्षत्राच्या तोंडावर पेरणीयोग्य पाऊस होऊन शेतकरी खरीप हंगामाच्या कामात व्यस्त झाले आहेत. मात्र खिशात पैसाच नसल्याने नियोजन करायचे कसे? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. शेतकरी बँकेत हेलपाटे मारत आहेत, मात्र बँका सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याची परिस्थिती आहे. कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच पीककर्जाचे वितरण असमाधानकारक आहे. एकूण लक्ष्यांकाच्या तुलनेत अवघे ७.२० टक्के कर्जवितरण झाले आहे. 

मागील वर्षभरात शेतमालाचे झालेले नुकसान व नसलेला अपेक्षित दर, यामुळे हातात भांडवल नाही. मग, आता पेरणी कशी करायची, ही समस्या शेतकऱ्यांपुढे आहे. त्यातच आता बँकांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडत नसल्याचे चित्र आहे. अग्रणी बँकेने चालू वर्षी जिल्ह्यात ३३०० कोटी रुपयांचा लक्ष्यांक जाहीर केला. त्यातच १ एप्रिलपासून वितरण सुरू होऊन अवघे २३७.९४ कोटी रुपयांचे वितरण झाले आहे. ही टक्केवारी अवघी ७.२० असल्याची माहिती समोर आली. 

गेल्या महिन्यात कृषिमंत्री दादा भुसे व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खरीपपूर्व बैठक घेतली. यानंतर आजपर्यंत अवघी ५ टक्के वाढ पीककर्ज वितरणात झाली. त्यातच जिल्हाधिकारी हे दर बुधवारी बैठक घेऊन आढावा घेत असले तरी वितरणाचा टक्का वाढत नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच पीककर्जाचे वितरण असमाधानकारक आहे.  बँकांचे काम कधी सुधारणार? 

हाती भांडवल नसल्याने शेतकरी बँकेत चकरा मारतो आहे. मात्र, त्याच्या पाठपुराव्याला बँका प्रतिसाद देत नसल्याची स्थिती आहे. मागील वर्षीही असाच अनुभव राहिला. मागील वर्षी ३१४७ कोटी रुपयांचा लक्ष्यांक होता. त्यापैकी ५८ टक्के वितरण झाले होते. यामागील कारणे काय? याचा शोध घेण्याबाबत सांगत लक्ष्यांक अधिक पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, अशीच परिस्थिती यावर्षी दिसून येत आहे. बँकांच्या कामगिरीत सुधारणा होणार कधी?हा प्रश्न आहे. 

बँका लक्ष्यांक (कोटी रुपये वितरण(कोटी टक्केवारी 
राष्ट्रीयकृत बँका २२४३.७९ १५१.०३ ६.७३ 
ग्रामीण बँका १६.८७ ०.७५ ४.७५ 
खाजगी बँका ६०५.७४ ५५.४९ ९.१६ 
जिल्हा सहकारी बँक ४३७.३७ .३०.६७ ७०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com