Agriculture news in marathi Crop loan disbursement in Jalgaon district did not accelerate | Page 3 ||| Agrowon

जळगाव जिल्ह्यातील पीक कर्जवाटपाला गती येईना

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 मे 2021

जळगाव ः जिल्ह्यात खरिपासंबंधी पीक कर्जवाटप गेल्या महिन्यात सुरू झाले आहे. पीक कर्जवाटपात जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर आहे. या बँकेने सुमारे २३० कोटी रुपये पीक कर्ज वितरण गेल्या आठवड्यापर्यंत केले आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात खरिपासंबंधी पीक कर्जवाटप गेल्या महिन्यात सुरू झाले आहे. पीक कर्जवाटपात जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर आहे. या बँकेने सुमारे २३० कोटी रुपये पीक कर्ज वितरण गेल्या आठवड्यापर्यंत केले आहे. 

राष्ट्रीयीकृत बँकांनी पुन्हा एकदा पीक कर्ज वितरणात हात आखडता घेतला आहे. फक्त ४५ कोटी रुपये पीक कर्ज वितरण या बँकांनी केले आहे. जिल्ह्यात सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा लक्ष्यांक आहे. हे कर्ज बँकांना आपल्या निधीतून वितरित करायचे असते. शासन फक्त वितरण लक्ष्यांक निश्चित करते. परंतु बँकाही कोविड व इतर समस्यांमुळे अडचणीत आहेत, असे सांगितले जात आहे. नवी पीक कर्ज प्रकरणे रखडली आहेत. बँकांमध्ये यासंबंधी कार्यवाही संथ आहे. पीक कर्ज नूतनीकरण फक्त राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांमध्ये केले जात आहे. 

जळगाव जिल्हा बँकेला पीक कर्ज वितरणाला लक्ष्यांक राष्ट्रीयीकृत बँकांएवढाच आहे. जिल्हा बँकेच्या सर्वाधिक शाखा ग्रामीण भागात आहेत. यामुळे बँकेने पीक कर्ज वितरणात आघाडी घेतली आहे. नवी प्रकरणेदेखील मार्गी लावली जात आहेत. जिल्ह्यात सेंट्रल बँक अग्रणी बँक  म्हणून काम करते. या बँकेसोबत इतर बँका व प्रशासनाची पीक कर्ज वितरणासंबंधी बैठक झालेली नाही. यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष आहे. 

कोरोनामुळे अडचणी

पीक कर्ज वितरणास राष्ट्रीयीकृत बँका गती देत नसल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. कारण, या बँका आपल्या शाखेत कोविडमुळे प्रवेश नाकारत आहेत. फक्त आरटीजीएस, ठेवी, शासकीय कामे सुरू राहतील, असे या बँका बजावत आहेत. यामुळे पीक कर्जवाटप पुढेही संथच राहील, अशी स्थिती आहे.


इतर बातम्या
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता...
नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन नगर : नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
साताऱ्यात भूस्खलनात आतापर्यंत ३२ जणांचा...सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
आवक कमी दाखवून बाजार समितीची फसवणूक पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे,...
नदीकाठावरील ऊस वाहून गेलानेर्ले, जि. सांगली : बहे रामलिंग बेटाच्या...
अकोल्यातील २३३६ कर्जदार सावकारी...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी...
गोंदिया : पावसाअभावी दीड लाख हेक्‍...गोंदिया :  देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन...
नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी...सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण...
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी...बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता....
नांदेडमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्याचे...नांदेड : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच सततच्या...
खानदेशात सोयाबीन पेरणीत घटजळगाव : खानदेशात यंदा नापेर क्षेत्र यंदा वाढणार...
खानदेशात कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवडजळगाव ः  खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा...
भीमा-नीरा नदी काठांवरील गावांनी सतर्क...सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या...
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३)...
नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम...येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...