Agriculture news in marathi Crop loan disbursement to over six thousand and five hundred farmers in Parbhani district | Page 2 ||| Agrowon

परभणी जिल्ह्यात साडेसहा हजारांवर शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात नोव्हेंबरअखेरपर्यंत ६ हजार ६१३ शेतकऱ्यांना ५० कोटी ७१ लाख (१६.१८ टक्के) पीक कर्जवाटप करण्यात आले. त्यात ४ हजार ८६४ शेतकरी नवीन आहेत, तर १ जार ७४९ शेतकऱ्यांनी कर्जाचे नूतनीकरण केले आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेच्या सूत्रांनी दिली.

परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात नोव्हेंबरअखेरपर्यंत ६ हजार ६१३ शेतकऱ्यांना ५० कोटी ७१ लाख (१६.१८ टक्के) पीक कर्जवाटप करण्यात आले. त्यात ४ हजार ८६४ शेतकरी नवीन आहेत, तर १ जार ७४९ शेतकऱ्यांनी कर्जाचे नूतनीकरण केले आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेच्या सूत्रांनी दिली.

यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यातील विविध बॅंकांना मिळून एकूण ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे पीककर्ज शेतकऱ्यांना वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांना १७३ कोटी १३ लाख रुपये, खासगी बँकांना ३३ कोटी ९८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला ३१ कोटी ८२ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला ७४ कोटी ५४ लाख रुपयांच्या उद्दिष्टाचा समावेश आहे. 

शनिवार (ता. ३०)पर्यंत राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ४ हजार ३२४ शेतकऱ्यांना ३३ कोटी ४३ लाख रुपयांचे (१९.३१ टक्के) पीक कर्जवाटप केले. खासगी बॅंकांनी ३३८ शेतकऱ्यांना ३ कोटी ३१ लाख रुपये (९.७४ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने १ हजार ६२४ शेतकऱ्यांना १२ कोटी ७१ लाख रुपयांचे (३९.९४ टक्के), जिल्हा बॅंकेने ३२७ शेतकऱ्यांना १ कोटी २६ लाख रुपये (१.६९ टक्के), असे सर्व बॅंकांनी एकूण ६ हजार ६१३ शेतकऱ्यांना ५० कोटी ७१ लाख रुपयांचे (१६.१८ टक्के) पीक कर्जवाटप केले.

गेल्या महिनाभरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची पीक कर्जवाटपात प्रगती दिसत नाही. जिल्हा बॅंकेचे सर्वांत कमी कर्जवाटप आहे. राष्ट्रीयीकृत बॅंका, खासगी बॅंकांची कर्जवाटपाची गती संथच आहे. महाराष्ट्र ग्रामीण बॅंक पीक कर्जवाटपात आघाडीवर आहे.

पीक कर्जवाटप स्थिती (कोटी रुपये)

बॅंक  उद्दिष्ट   रक्कम टक्केवारी  शेतकरी
राष्ट्रीयीकृत बॅंका १७३.१३ ३३.४३  १९.३१  ४३२४
खासगी बॅंका ३३.९८ ३.३१ ९.७४ ३३८
म.ग्रा.बॅंक  ३१.८२ १२.७१ ३९.९४ १६२४
जिल्हा बॅंक  ७४.५४ १.२६  १.६९   ३२७

 


इतर ताज्या घडामोडी
पिवळ्या पर्णछत्राची समस्या, कारणे जाणून...पावसाळा सरल्यानंतर थंडी पडली की बऱ्याच बागांमध्ये...
लिंबूवर्गीय फळपीक सल्ला सद्य:स्थितीत शेतकऱ्यांनी आंबिया बहरासाठी ...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची २५०० ते ४६२५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
असे करा रुगोज चक्राकार पांढरी माशीचे...थंडी वाढू लागल्यानंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात...
नगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७१ कोटींची...नगर ः जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे ९७१...
खानदेशातील ‘रब्बी’ला ढगाळ वातावरणाचे...जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-...
उद्योगमंत्र्यांनी जाणली रेशीम...औरंगाबाद : जिल्ह्यात रेशीम कोषाचे उत्पादन,...
फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे काजू...सिंधुदुर्ग : ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगांमुळे...
दहा वर्षांत सातारा जिल्ह्यातील १३८०...सातारा  ः जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी...
मुळा, भंडारदरा धरणांतून आजपासून आवर्तननगर  ः यंदा पाऊस चांगला झाल्याने...
पुणे कृषी महाविद्यालयातील ...पुणे  ः विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार...
भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणीपुणे  : जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात यंदा दमदार...
हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत...हिंगोली : पाऊस लांबल्यामुळे हिंगोली, नांदेड,...
शिरवाडे वणीत जलसंधारणासाठी...नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि...
कुरखेडा तालुक्यात सेवा सोसायट्यांचा धान...गडचिरोली  ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत...
नवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून...नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी...
धान खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांचा...भंडारा  ः गेल्या दोन महिन्यांपासून बंद...
काँग्रेसचा दर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’ मुंबई  : विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या...
मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने...मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
महाविकास आघाडीची समन्वय समिती होणार...मुंबई  ः राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच...