सांगली जिल्ह्यात पीक कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांचा हात आखडता

सांगलीः जिल्हा बॅंकेने जूनअखेर ६६.८२ टक्के कर्जवाटप केले, तर राष्ट्रीयीकृत बॅंकांसह इतर बॅंकांनी ३५ टक्केच कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांसह अन्य बॅंकांनी कर्ज वाटपासाठी हात अकडता घेतला असल्याचे चित्र आहे. जूनअखेर एकूण ५१ टक्के कर्जवाटप झाले आहे.
Crop loan disbursement in Sangli district The hand of nationalized banks is weak
Crop loan disbursement in Sangli district The hand of nationalized banks is weak

सांगली ः जिल्हा बॅंकेने जूनअखेर ६६.८२ टक्के कर्जवाटप केले, तर राष्ट्रीयीकृत बॅंकांसह इतर बॅंकांनी ३५ टक्केच कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांसह अन्य बॅंकांनी कर्ज वाटपासाठी हात अकडता घेतला असल्याचे चित्र आहे. जूनअखेर एकूण ५१ टक्के कर्जवाटप झाले आहे. 

यंदाच्या खरीप हंगामातील पीक कर्जवाटपाची गती वाढली आहे. जिल्ह्यातील ९७ हजार ३९४ शेतकऱ्यांना ७९९.५१ कोटींचे खरीप हंगामातील पीक कर्जवाटप केले आहे. सर्वाधिक वाटप जिल्हा बॅंकेने केले आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.  जिल्हा बॅंकेला ८३२.३० कोटी, तर राष्ट्रीयीकृत व इतर बॅंकांना ७२४.७० असे एकूण १५५७ कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार यंदा पीक कर्जवाटपास सुरवात झाली. परंत, कर्ज वाटपाची गती कमी होती. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास विलंब झाला. ऐन हंगामात शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची प्रतीक्षा करावी लागली.

जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची खाती जिल्हा बॅंकेत आहेत. त्यामुळे त्यांना कर्ज पुरवठा होण्यास अडचणी आल्या नाहीत. परंतु, कर्जवाटपाची टक्केवारी समाधानकारक नसल्याने जूनअखेर ६० टक्के कर्जवाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. 

दरम्यान, गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात कृषिमंत्री दादा भुसे यांनी आढावा बैठक घेतली. त्यात कृषी विभाग, कर्जवाटपाची माहिती घेतली होती. परंतु, खरीप हंगामातील पीक कर्जवाटपाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बॅंकांना १५ जुलैपर्यंत १०० टक्के कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हा बॅंक वगळता राष्ट्रीयीकृत बॅंका कर्जवाटपात गती घेणार का? पंधरा दिवसांत १०० टक्के कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार का? असा प्रश्न आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com