परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाची उद्दिष्टपूर्ती कोसो दूर

परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाची उद्दिष्टपूर्ती कोसो दूर
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाची उद्दिष्टपूर्ती कोसो दूर

परभणी : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याअखेरपर्यंत ४३ हजार ९०९ शेतकऱ्यांना २४३ कोटी ८३ लाख रुपये (१६.५८ टक्के) पीक कर्जवाटप झाले आहे. सर्वाधिक उद्दिष्ट असूनही राष्ट्रीयीकृत बॅंकांनी हात आखडता घेऊन केवळ ६.५० टक्के कर्जवाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बॅंक आणि खासगी बँकांचे कर्जवाटप ४० टक्क्यांच्या आतच आहे. जिल्हा बॅंकेने उद्दिष्टाचा अर्धा टप्पा पार केला. ३० सप्टेंबरपर्यंत खरीप पीक कर्जवाटप केले जाते. त्यानंतर रब्बी पीक कर्जवाटप सुरू होते. कर्जवाटपाची गती संथ असल्याने उद्दिष्ट कोसो दूर असल्याची स्थिती आहे. 

यंदा जिल्ह्यातील सर्व बॅंकांना खरीप हंगामात १ हजार ४७० कोटी ४४ लाख रुपये एवढे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. राष्ट्रीयीकृत बॅंकांना १ हजार ५२ कोटी ३६ लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी ६ हजार ६८३० शेतकऱ्यांना ६६ कोटी ९२ लाख रुपये (६.५० टक्के) पीक कर्जवाटप केले. खासगी बॅंकांनी ७५ कोटी २१ लाख रुपयांपैकी १ हजार ६९२ शेतकऱ्यांना २७ कोटी ५५ लाख रुपयांचे (३६.६३ टक्के) पीक कर्जवाटप केले.

महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २०० कोटी १४ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ५ हजार ५७१ शेतकऱ्यांना ५५ कोटी ८७ लाख रुपये (२७.९२ टक्के) वाटप केले.

जिल्हा बॅंकेला १६५ कोटी ४७ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी २९ हजार ८१६ शेतकऱ्यांना ९३ कोटी ४९ लाख रुपये (५६.५० टक्के) वाटप केले. सर्व बॅंकांनी एकूण ४३ हजार ९०९ शेतकऱ्यांना २४३ कोटी ८३ लाख रुपयांचे (१६.५८ टक्के) पीक कर्जवाटप केले. यंदा नूतनीकरण केलेल्या ६ हजार २५१ शेतकऱ्यांना ५८ कोटी ८२ लाख रुपयांचे पीककर्ज  देण्यात आले. 

जिल्हानिहाय पीक कर्जवाटप स्थिती (कोटी रुपये)

बॅंक उद्दिष्ट  वाटप  टक्केवारी शेतकरी संख्या
राष्ट्रीयीकृत बॅंका १०२९.६२ ६६.९२ ६.५०  ६८३०
खासगी बॅंका  ७५.२१ २७.५५  ३६.६३  १६९२
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक २००.१४ ५५.८७ २७.९२ ५५७१
जिल्हा बॅंक १६५.४७   ९३.४९  ५६.५०  २९८१६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com